औरैया: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एका पत्नीने प्रियकरासोबत पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 मार्च रोजी औरैयाच्या सहार पोलीस स्टेशन हद्दीतील पलिया गावात गव्हाच्या शेडमध्ये दिलीप नावाचा संशयित जखमी आढळून आल्यानंतर त्याला परिसरातील लोकांनी रुग्णालयात नेले जिथे त्याचा उपचारा दरम्यान, मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत आढळलेल्या दिलीप यादवची उपचारादरम्यान मृत्यू झाला होता दरम्यान या हत्येचा तपास केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलिसांनी दिलीपची पत्नी प्रगती, तिचा प्रियकर अनुराग आणि खुनी रामजी नगर या आरोपींना अटक केली आहे. प्रगती आणि अनुराग यांच्यात चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि दिलीपला या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळल्यानंतर आरोपींनी हत्येची योजना आखली होती. दिलीपला मारण्यासाठी प्रगतीने रामजी नगरला २ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
दिलीप यादव यांचा 5 मार्च 2025 रोजी प्रगती यादवसोबत विवाह झाला होता. प्रगती आणि प्रियकर अनुराग हे एकाच गावचे रहिवासी होते आणि त्यांचे सुमारे 4 वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रगतीच्या घरच्यांना दोघांच्या त्यांच्या अफेअरची माहिती होती, पण लग्नाला परवानगी नव्हती. यानंतर प्रगतीच्या घरच्यांनी दिलीप यादवसोबत तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले, या लग्नामुळे प्रगती खुश नव्हती, दरम्यान, तिने दिलीपच्या हत्येचा कट रचला.
कटात आणखी कोणी सहभागी आहे का हे पाहण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, स्थानिकांनी या क्रूर हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी न्याय मिळेल आणि आरोपींना योग्य ती शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.







