Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला अवघ्या काही दिवसांवर! सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी; दसऱ्यापूर्वी निकाल लागण्याचे स्पष्ट संकेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 6 October 2026, 18:41

मुंबई: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल आपली बाजू मांडत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल दसऱ्याआधी लागण्याची शक्यता असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान मिळाले आहेत.

ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू असताना या प्रकरणावर सलग सुनावणी झाली होती. मात्र, शिंदे गटाच्या वकिलांना सलग युक्तिवाद करण्याची संधी मिळालेली नाही. मागील आठवड्यात यूपीएएसीवरील सुनावणीमुळे या प्रकरणाची सुनावणी सलग तीन वेळा रद्द झाली होती. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावर सुनावणी किती काळ चालणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी सुनावणी झाल्यानंतर एका वकिलाने तामिळनाडूशी संबंधित प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्तींकडे वेळ मागितला. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दसऱ्यानंतर सुनावणी घेऊ, असे सांगितले. त्यावेळी वकिलाने आता वेळ मिळू शकत नाही का, अशी विचारणा केली. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शिवसेना प्रकरणावर बऱ्यापैकी सुनावणी झाली असून दसऱ्याआधी हे प्रकरण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यामुळे दसऱ्याआधीच या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मुद्दा मांडला. ठाकरे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत आणि त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने राज्यपालांना एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करावे लागले, असा युक्तिवाद कौल यांनी केला. या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती मोहना यांच्यात दीर्घ चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता पुढील सुनावणीत कोणते मुद्दे समोर येतात आणि सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात भुतबाधेच्या नावाखाली तृतीयपंथी महिलेचे कपडे काढले; खिडकीला बांधून मिरचीची धुरा देत मारहाण; तृतीयपंथी गुरुसह चौघांवर गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 19:53

‘थांब तुझ्या नवऱ्याला आपले फोटो पाठवतो’ विवाहितेचे ७०हुन अधिक अश्लील व्हिडिओ काढले; मैत्रीचा गैरफायदा घेत संबंध ठेवले अन् नकार देताच..

Tuesday, 6 October 2026, 19:44

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला अवघ्या काही दिवसांवर! सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी; दसऱ्यापूर्वी निकाल लागण्याचे स्पष्ट संकेत

Tuesday, 6 October 2026, 18:41

मुंबईत दिवाळीआधीच फटाक्यांना ‘नो एंट्री’! पोलिसांचा कडक इशारा, नियमावली जाहीर

Tuesday, 6 October 2026, 18:36

अवैध माती उपशामुळे दौंड-शिरूर सीमेवर धुमाकूळ; डुप्लिकेट रॉयल्टी पावत्यांचीही चर्चा

Tuesday, 6 October 2026, 18:22

“पुणे बंद करून दाखवाच!” महापौरांचं MPSC आंदोलकांना थेट खुलं आव्हान; आंदोलन पेटणार?

Tuesday, 6 October 2026, 18:16
Next Post

'थांब तुझ्या नवऱ्याला आपले फोटो पाठवतो' विवाहितेचे ७०हुन अधिक अश्लील व्हिडिओ काढले; मैत्रीचा गैरफायदा घेत संबंध ठेवले अन् नकार देताच..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp