Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sunetra Pawar: शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा! “लवकर या, लवकर जा” धोरण लागू होणार; महिला सक्षमीकरणासाठी सरकारचा मास्टर प्लॅन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 10 March 2026, 16:52
Sunetra Pawar: Sunetra Pawar's big announcement for women government employees! "Early come, early leave" policy to be implemented; Government's master plan for women empowerment

मुंबई: जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर( Sunetra Pawar) राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. विधिमंडळाच्या (Come Early Go Early) अधिवेशनात बोलताना त्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली, गो अर्ली’ ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे महिलांना कामाच्या वेळेबाबत थोडी लवचिकता मिळणार असून काम आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळणे अधिक सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics)

या नव्या व्यवस्थेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.15 वाजता कार्यालयात हजेरी लावल्यास त्यांना संध्याकाळी अर्धा तास लवकर घरी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. कामाच्या वेळेत ही लवचिकता देण्यामागे महिलांवरील घरगुती जबाबदाऱ्या, प्रवासाचा ताण आणि कुटुंबातील समतोल राखण्याची गरज लक्षात घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. विशेषतः मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रवासासाठी मोठा वेळ खर्च होतो. त्यामुळे अशा निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महिला दिनानिमित्त सभागृहात अनेक सदस्यांनी महिलांच्या प्रश्नांवर आपली मते मांडली आणि काही महत्त्वाच्या सूचनाही पुढे आल्या. पुरुष सदस्यांनीही महिलांच्या कामाच्या अडचणी आणि सामाजिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केल्याचे पवार यांनी नमूद केले. सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत असल्याचे सांगताना त्यांनी ‘लाडकी बहीण’, ‘लेक लाडकी’ आणि ‘अन्नपूर्णा’ यांसारख्या योजनांचा उल्लेख केला. तसेच सायबर आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याबाबतही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

याशिवाय राज्यातील 17000 अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाषणादरम्यान सुनेत्रा पवार यांनी साखर उद्योगासंदर्भातील मुद्दाही उपस्थित केला. साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करताना किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे साखर कारखान्यांवर होणाऱ्या परिणामाकडेही लक्ष वेधले. राज्यात नवे उद्योग आणताना पारंपरिक उद्योगांनाही समान महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली कदमवस्ती शाळा; शिक्षणोत्सवाने निर्माण केले नवचैतन्य

Tuesday, 16 June 2026, 14:13

भिवरी येथे जेवणाच्या वादावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पती फरार

Tuesday, 16 June 2026, 14:09

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्व हादरले; इंडस्ट्रीतील छळाला कंटाळून संपवले आयुष्य? मावशीने सांगितलं कारण

Tuesday, 16 June 2026, 13:40

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35
Next Post
Loni Kalbhor News: “Went for lunch and was robbed by a thief! Gym trainer's bike stolen in Loni Kalbhor”

Loni Kalbhor News: “जेवायला गेला आणि चोरट्याने डल्ला मारला! लोणी काळभोरमध्ये जिम ट्रेनरची दुचाकी लंपास”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.