Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 2 September 2026, 15:53

मुंबई: एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात यापूर्वी तीन अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर नंदुरबार येथून ऋतुजा पाटील हिलाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. बुधवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ऋतुजा पाटीलला तीन दिवसांची, तर इतर आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तपासासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचाही दावा पोलिसांनी केला.

तपासादरम्यान एमपीएससी अधिकारी विश्वेश्वर नकाते याने वापरलेला लॅपटॉप खाडीत फेकल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा लॅपटॉप फेकण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या लॅपटॉपमध्ये परीक्षेतील 294 प्रश्न आणि त्यांचे पर्याय नोंदवण्यात आल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयात सांगितले. पोलिसांनी हा लॅपटॉप शोधून काढला असून त्यातील माहिती रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.

तसेच नंदुरबार येथील कौटिल्य क्लासेसचे संचालक आणि आरोपी प्रवीण पाटील यांच्या घरातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही कागदपत्रे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

 

दरम्यान, ऋतुजा पाटीलला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर ती भावूक झाल्याचेही दिसून आले. तिच्या वकिलांनी न्यायालयात वेगळी बाजू मांडली. ऋतुजाला पाठवण्यात आलेला प्रश्नसंच एमपीएससीचा असल्याची माहिती तिला नव्हती, असा युक्तिवाद करण्यात आला. गौरव पाटीलला 20 तारखेला प्रश्नसंच मिळाला होता आणि ऋतुजाने तो त्याला पाठवला होता, मात्र तो एमपीएससीचा प्रश्नसंच असल्याचे तिला माहीत नव्हते, असा दावा बचाव पक्षाने केला.

या प्रकरणात प्रश्नपत्रिका नेमकी कशी बाहेर पडली, ती कोणाकडून कोणाकडे पोहोचली आणि त्यातून किती जणांना फायदा झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लॅपटॉपमधील माहिती आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासल्यानंतर पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19
Next Post

मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर पालिकेतील वाद मिटल्याचा दावा; पण अमोल बालवडकरांचा निधी अद्याप अडकलेलाच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp