Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोपटाला तडफडत ठेवलंय, फक्त ते कधी मरतंय याची वाट बघायची; आमदार जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 19 March 2024, 19:16
MLA jitendra Ahwad Post on twitter about NCP supreme court hearing

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे. तसेच कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव देखील वापरण्याची परवानगी दिली आहे. तसेच निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला अथवा उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले .

 

तसेच अजित पवार गटाने प्रचारात मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये सर्व ठिकाणी हे डिक्लेरेशन देत नमूद करावे की, घड्याळ हे चिन्ह आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या केसवर अटीशर्तींसह मिळालं आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला झाल्यावर ते कायम होईल, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

यानंतर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल म्हणजे पोपटाला तडफडत ठेवून दिले आहे; फक्त मरण जाहीर करायचे आहे. आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये पाच महत्वाची निरीक्षणे नोंदविली. त्यातील पहिले निरीक्षण म्हणजे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव कायम ठेवण्यात आले. तुतारी हे पक्षचिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कायम असून महाराष्ट्रात इतर कोणालाही तुतारी हे पक्षचिन्ह वापरता येणार नाही, हेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र हे अपूर्ण असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले. प्रादेशिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राला मान्यता देता येणार नाही, असे सांगून राष्ट्रीय स्तरावरील प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत सूचना न्यायालयाने केल्या. तसेच, जर अशा पद्धतीने लोक पक्ष बदलू लागले, तर दहाव्या अनुसूचीचे काय करायचे? असा प्रश्न युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाच्या वकिलांना विचारला. सर्वात महत्वाचे म्हणजे, “तुम्हाला घड्याळ चिन्ह वापरता येईल. घड्याळ चिन्ह मिळालेले नाही. ते चिन्ह सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे, असे प्रत्येक पोस्टरवर लिहावे लागणार आहे.” असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

म्हणूनच मी म्हटले की पोपटाला तडफडत ठेवलं आहे. फक्त ते कधी मरतंय, याची वाट बघायची आहे. आजचा निकाल जरी घड्याळ चिन्ह देणारा असला तरी खाली जे लिहायचे आहे, “कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून” यावरून कोर्टाला कुठे तरी जाणवलं आहे की, हा सर्व खोटारडेपणा झालेला आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावर कदाचित हे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळेच कोर्टाने निकाल राखून ठेवला. मात्र, कोर्टाने इशारा तर देऊनच टाकला आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल म्हणजे पोपटाला तडफडत ठेवून दिले आहे; फक्त मरण जाहीर करायचे आहे. आज मा. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये पाच महत्वाची निरीक्षणे नोंदविली. त्यातील पहिले निरीक्षण म्हणजे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव कायम ठेवण्यात आले. तुतारी हे… pic.twitter.com/1dC366WBwF

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 19, 2024

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील ‘या’ ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष…

Friday, 10 April 2026, 18:00

डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! चक्क महिलेला HIV पॉसिटीव्हचा चुकीचा रिपोर्ट दिला; संशयावरून सासरच्यांनी घराबाहेर काढलं अन्…

Friday, 10 April 2026, 17:47

वरवंड येथील गोपीनाथ मंदिरात पिंडीवर चढून अयोग्य कृत्य; भाविकांच्या भावना दुखावल्याने इसमावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख

Friday, 10 April 2026, 17:43
Solapur

Solapur : ‘भोसे पॅटर्न’ हिट! मोडलिंबमध्ये ग्रामस्थांनी स्वतःहून हटवले महापुरुषांचे पुतळे; संवादातून तणावावर कायमचा तोडगा

Friday, 10 April 2026, 17:42

“तुमचं वय १८ ते ४० दरम्यान आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच! वृद्धापकाळात कोणी आधारदेवो ना देवो, सरकार देणार दरमहा ५००० रुपये; पाहा अर्ज करण्याची पद्धत”

Friday, 10 April 2026, 17:34
Next Post

Uruli Kanchan News : अस्मिता हायस्कूलसमोर लाकडी दंडुके घेऊन फिरणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल; तीन जण ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.