Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: आधी बाप पळवला, मग पक्ष अन् आता भाऊ पळवायला निघाले! राज-शिंदेंच्या भेटीची ती पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 February 2026, 16:02
Maharashtra Politics: First the father was kidnapped, then the party and now the brother is going to be kidnapped! That post about Raj-Shinde's meeting is in the news; Bochri criticism on Uddhav Thackeray

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी (ता. 18) ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने राज्याच्या (Maharashtra Politics) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित भेटीनंतर विविध राजकीय चर्चा (Shivsena) रंगल्या असून आगामी महापालिका निवडणुकांच्या (MNS) पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

 

या भेटीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला!!!” असे लिहून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो शेअर केला. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

तसेच शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची भेट झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला. परंतु बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल.”

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. तसेच राज ठाकरे यांनीही महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह आगामी राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या भेटीमुळे महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्याचे दिसत असून, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहण्याची चिन्हे आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
Next Post
Crime

Crime : ९७ सीसीटीव्ही कॅमेरे अन् बदललेलं रिक्षाहूड; ४० वर्षीय महिलेचा खुनाचा थरारक घटनाक्रम उघड.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.