Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तीनही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचं नावच नाही; सस्पेन्स वाढला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 5 December 2024, 14:54

मुंबई : विधासभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी महायुती सरकारचा शपथविधी होत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज मुंबईच्या आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे, असं जाहीर करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव या पत्रिकेवर छापलेले नाही. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 

तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर शिंदेंचं नाव नाही

शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांच नाव नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेवर शिंदे यांचं नाव नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या निमंत्रण पत्रिकेवरती केवळ देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं नाव आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे या सरकारमध्ये कोणत्या पदावर दिसणार याबाबतचा संभ्रम अद्याप संपलेला नाही. आज सकाळपर्यंत समोर आलेल्या बातम्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली आहे. तसेच ते देखील शपथ घेणार आहेत अशी चर्चा होती. मात्र, आता समोर आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून हा संभ्रम कायम असल्याचा दिसून येत आहे.

या विषयावर आता उदय सामंत यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असं ते म्हणाले. तसेच या विषयाकडे राजकारण म्हणून न पाहता हा विषय आमच्यासाठी भावनिक असल्याचेही उदय सामंत यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. शिवसेनेकडून कुणाचीही नावे आता माध्यमात येऊ नयेत, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या कुणाच्याही मनात या खुर्चीवर बसण्याचा विचार नाही. हा खुलासा करणेही आमच्यासाठी दुर्दैव आहे. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्या सर्वांचे राजकीय भवितव्य त्यांच्या हातात दिले आहे. त्यांना डावलून कुणी काही करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.

निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचे नाव का नाही?

प्रत्येक पक्षाने आपापल्या निमंत्रण पत्रिका छापून त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना द्याव्यात. त्याची नोंद पोलीस स्थानकात ठेवावी. असा निर्णय महायुतीच्या बैठकीत झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने जी पत्रिका छापली, त्यात अजित पवार यांचे नाव टाकलेले आहे. तर शिवसेनेने शासनाच्या निमंत्रण पत्रिकेचा फॉरमॅट घेतला असल्यामुळे यात काही ठरवून झाले आहे, असं आम्हाला वाटत नाही, असंही उदय सामंत म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये भरदुपारी दुहेरी आग; माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Monday, 4 May 2026, 18:33

Nasarapur News : अत्याचार-हत्याकांडातील नराधमाला “कठोरात कठोर शिक्षा द्या” – आरोपीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

Monday, 4 May 2026, 17:30
135 crore drugs seized in pune four arrested

Mumbai Drug News : मुंबई विमानतळावर ड्रग्जचा मोठा सापळा उधळला; 7 कोटींचे कोकेन जप्त, दोघे अटकेत

Monday, 4 May 2026, 17:20

Indapur News : यात्रेत सुट्ट्या पैशांच्या वादातून तरुणाचा मृत्यू; आईस्क्रीम विक्रेत्यावर खुनाचा गुन्हा

Monday, 4 May 2026, 17:07

Indapur Crime News : वालचंदनगर येथे आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासू, सून व नातेवाईकांना घरात घुसून बेदम मारहाण ; जीवे मारण्याची दिली धमकी, 7 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 4 May 2026, 16:39

Ashok Kharat : प्रॉक्सी खात्यांचा गुंता आणि कोटींचे व्यवहार; रुपाली चाकणकरांच्या बहिणीची ईडीसमोर हजेरी, खरात प्रकरणात काय उघड होणार?

Monday, 4 May 2026, 16:38
Next Post
Maharashtra government revises fee for shet jamin mojani

जमीन मोजणी शुल्कात सरकारने केली वाढ, नवीन निकष अंमलात; आता मोजावे लागणार किमान २ हजार रुपये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.