Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार ‘एवढे’ रुपये?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 November 2025, 12:45
Crop Insurance Scheme: State government's Rs 31,000 crore aid scheme; Will every farmer get Rs 17,500?

photo - social media

Crop Insurance Scheme : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली होती.

 

या पॅकेजअंतर्गत पीकविमा योजनेतून प्रति हेक्टर 17,500 रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, ही मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नसून ती महसूल मंडळातील पीककापणी प्रयोगांमधून मिळालेल्या सरासरी उत्पादनाच्या आकडेवारीवर आधारित असेल. महसूल मंडळानुसार उत्पादनात फरक असल्याने प्रत्येक भागातील नुकसानभरपाई वेगवेगळी ठरू शकते.

या योजनेनुसार विमा कंपनीच नुकसानभरपाईची अंतिम रक्कम निश्चित करणार आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत सर्व शेतकऱ्यांना समान प्रमाणात मिळेलच, असे नाही. राज्यातील जवळपास 90 टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. आतापर्यंत राज्यातील सुमारे 82 टक्के महसूल मंडळांमधील पीककापणी प्रयोगांचे अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत, तर उर्वरित 18 टक्के मंडळांचे अहवाल 15 डिसेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच नुकसानभरपाईचे वितरण सुरू होईल.

महसूल मंडळातील सरासरी उत्पादनाची तुलना गेल्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी, म्हणजेच उंबरठा उत्पादनाशी, केली जाणार आहे. जर चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल, तर त्या भागातील शेतकरी नुकसानभरपाईस पात्र ठरतील. उदाहरणार्थ, जर सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या 10 टक्क्यांनी कमी असेल, तर शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 10 टक्के इतकी भरपाई मिळेल. उत्पादन पूर्णपणे घटले असल्यास, म्हणजेच सरासरी उत्पादन शून्य असल्यास, संपूर्ण विमा संरक्षित रक्कम भरपाई म्हणून दिली जाईल.

सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम जास्तीत जास्त 56,000 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. त्यामुळे पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीककापणी प्रयोगांचे अंतिम अहवाल तयार होत असून, या आकडेवारीच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत विमा मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00
Next Post
Vijay Wadettiwar on Parth Pawar: Big news..! Parth Pawar's company sold 'Mahar Watana' lands! Land worth 1800 crores for 300 crores? Serious allegations from Danve-Wadettiwar

Vijay Wadettiwar on Parth Pawar: मोठी बातमी..! पार्थ पवारांच्या कंपनीने 'महार वतनाच्या' जमिनी लाटल्या! 1800 कोटींची जमीन 300 कोटींत? दानवे-वडेट्टीवारांकडून गंभीर आरोप  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.