मुंबई: मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या (Crime News) तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसमधून तब्बल 12 कोटी रुपयांचे अमली (Mumbai News) पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई पोलीस गुन्हे शाखेने शनिवारी ही कारवाई केली. (Pune Crime)

गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक यांना मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या बसमधून अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार विलेपार्ले येथे बस थांबणार असल्याची खात्री करून पोलिसांनी सापळा रचला.
बस पुण्याकडे रवाना होण्यापूर्वीच तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान अक्षयच्या बॅगेतून साडेतीन किलो एमडी (मेफेड्रोन) आणि 500 ग्रॅम कोकेन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत अंदाजे 12 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी अक्षय कांडियली या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो हा माल पुण्यात नेमका कोणाला देणार होता? यामागील मुख्य सूत्रधार कोण? या प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू आहे.







