Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सरकारचा मोठा निर्णय; वंशावळ जुळवणी प्रक्रियेला थेट १ वर्षाची मुदतवाढ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 12:04

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेल्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमार्फत वंशावळ जुळवून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया केली जाते. या समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 रोजी संपला होता. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये वंशावळ जुळवणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सरकारने समितीला 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच प्रलंबित असलेली जुळवणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 25 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यामुळे मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी उपवर्गीकरणाची मागणी करण्याचा सल्ला दिला आहे. जरांगे पाटील यांनी 58 लाख नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. तसेच सातारा, कोल्हापूर, दौंड आणि पुणे या भागांसाठीही कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय काढण्याची मागणी केली आहे.

 

राठोड यांच्या मते, त्याऐवजी ओबीसींचे उपवर्गीकरण केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न व्यापक पातळीवर सोडवण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाकडे आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

योगी की अखिलेश? उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीचा जनतेने दिला कौल; सर्वेच्या आकड्यांनी उडवली राजकीय पक्षांची झोप

Wednesday, 26 August 2026, 12:43

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सरकारचा मोठा निर्णय; वंशावळ जुळवणी प्रक्रियेला थेट १ वर्षाची मुदतवाढ

Wednesday, 26 August 2026, 12:04

शिरूर बायपास येथील अपघातांविरोधात प्रतीकात्मक तिरडी; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध…..

Wednesday, 26 August 2026, 11:53

पुण्यात मद्यधुंद महिलेने मित्राला दगडाने ठेचून मारलं! कासारसाईला दोघं दारू प्यायला बसले किरकोळ वादातून त्याने हात पिरगाळला अन् तिचं डोकं सटकलं

Wednesday, 26 August 2026, 11:29

उजनी पाणलोटातील मच्छी तळी, मांगूर पालनाच्या तक्रारींची चौकशी करण्याची मागणी

Wednesday, 26 August 2026, 11:07

कोळविहिरे येथील घाटेमळ्यात भरदिवसा घरफोडी; 14 लाखांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Wednesday, 26 August 2026, 11:01
Next Post

योगी की अखिलेश? उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीचा जनतेने दिला कौल; सर्वेच्या आकड्यांनी उडवली राजकीय पक्षांची झोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp