Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी FDA अधिकारी आहे’ दुकानमालकाला सांगताच तो थरथर कापायला लागला; दुकान सील करण्याची धमकी, ६ लाख उकळले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 July 2026, 18:29

मुंबई: महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्वीट मार्ट चालकांमध्ये एफडीएच्या तपासणीबाबत भीतीचे वातावरण आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही भामट्यांनी वसईतील एका व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी काही स्त्री-पुरुष वसईतील एका नामांकित स्वीट मार्टमध्ये गेले. त्यांनी स्वतःची ओळख एफडीएचे वरिष्ठ अधिकारी अशी करून दिली आणि दुकानाची तपासणी करण्यास सुरुवात केली. तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांमध्ये त्रुटी असल्याचा दावा करत दुकान सील करण्याची, गुन्हा दाखल करण्याची आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची धमकी त्यांनी दुकानमालकाला दिली.

या धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाकडे आरोपींनी सुरुवातीला 12 लाख रुपयांची मागणी केली. अखेर वाटाघाटीनंतर 6 लाख रुपयांवर तडजोड झाली आणि दुकानमालकाने आरोपींना रोख रक्कम दिली. आरोपी निघून गेल्यानंतर संबंधित व्यक्ती सरकारी अधिकारी नसल्याचा संशय आल्याने दुकानमालकाने चौकशी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी विजय जाधव, स्वाती तुळसकर, स्वाती राठोड आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक, खंडणी उकळणे आणि बनावट सरकारी अधिकारी असल्याचे भासविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान या टोळीने यापूर्वी मुंबईतील काही व्यापाऱ्यांनाही अशाच प्रकारे लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी कोणतीही तपासणी करणारी व्यक्ती आल्यास तिची अधिकृत ओळखपत्रे आणि नियुक्तीची खात्री करूनच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Wednesday, 28 October 2026, 10:24

“पूजा झाल्याशिवाय जवळ येऊ नका!” नवरीचा बहाणा अन् संधी मिळताच सोनं, रोकड घेऊन पसार झाली लुटेरी दुल्हन

Wednesday, 28 October 2026, 10:14

नऱ्हेतील 21 वर्षीय तरुणावर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

Wednesday, 28 October 2026, 10:00
Next Post

कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात सोलर पॅनल असूनही ग्राहकांना बसतोय 'आर्थिक शॉक; कृषिराज चौधरी यांच्याकडून वीज पुरवठा खंडित न करण्याची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp