मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा डाव टाकला आहे. एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती केली आहे. अशातच हा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभेत मिळालेल्या परभवानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आगामी निवडणुकीत शिंदे गटाची ताकत वाढली आहे.

दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू एकनाथ शिंदेसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. मात्र, आता एकनाथ शिंदेंसोबत आनंदराज आंबेडकर यांनी हातमिळवणी केल्यानंतर हा ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई व महाराष्ट्रात आहे.








