Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ajit pawar death : सहा प्रवासी की पाच मृतदेह? अजित पवार अपघातावर अमोल मिटकरींचे आरोप, उज्ज्वल निकमांनी स्पष्टचं सांगितलं…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 February 2026, 12:47
ajit pawar death

photo- social media

ajit pawar death : बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि निर्णायक नेतृत्व हरपल्याने कार्यकर्ते, समर्थक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर शोकासोबतच अनेक प्रश्न आणि संशयही पुढे येत आहेत. (ajit pawar death)

 

अपघातानंतर सुरुवातीला विमानात सहा प्रवासी होते आणि सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र घटनास्थळी पाच मृतदेहच सापडल्याचे सांगितले जात असल्याने संशयाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा उचलून धरत “सहावा प्रवासी कोण होता?” असा थेट सवाल केला. यामुळे हा अपघात केवळ तांत्रिक कारणांमुळे झाला की यामागे काही वेगळं कारण आहे, यावर चर्चा सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी संशयांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. निकम यांच्या मते, विमानात सहा प्रवासी होते, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा सध्या उपलब्ध नाही. अपघातग्रस्त विमानात मोठ्या प्रमाणावर इंधन असल्यामुळे मृतदेह अत्यंत जळालेल्या अवस्थेत सापडणे ही दुर्दैवी पण तांत्रिकदृष्ट्या शक्य बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. “विनाकारण संशय निर्माण करून या घटनेला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न होतो आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. कटाचा आरोप करायचा असेल तर त्यासाठी किमान प्राथमिक पुरावे आवश्यक असतात आणि ते अद्याप समोर आलेले नाहीत, असंही निकम यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे, अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावनिक आणि आक्रमक प्रतिक्रियेमुळे वातावरण अधिक तापलं आहे. “दादा असे सहज जाऊ शकत नाहीत,” असा दावा करत त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

हे प्रकरण महत्त्वाचे ठरण्याचं कारण म्हणजे, अजित पवार हे सत्तास्थापनेत आणि राज्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावत होते. त्यांच्या निधनानंतर केवळ राजकीय समीकरणेच बदलणार नाहीत, तर या अपघाताभोवती फिरणाऱ्या संशयांमुळे सरकारची विश्वासार्हता आणि तपास यंत्रणांची भूमिका यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या घटनेवर पारदर्शक आणि विश्वासार्ह तपास होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
ajit pawar death

ajit pawar death : सुप्रिया सुळेंचा ‘तो’ स्टेटस चर्चेत; एक फोटो, एक शब्द, अनेक अर्थ, राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना नवी धार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.