Turmeric Water: भारतीय पाककृतींमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या हळदीचे अनेक आरोग्य फायदे आहे. रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिल्याने विविध आरोग्य समस्या दूर होतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन ऑईल हे फायटो केमिकल्स असतात.आयुर्वेदिक औषधांमध्ये विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके हळदीचा वापर केला जात आहे. हळदीत कॅन्सरसारखा जीवघेणा आजार रोखण्याची ताकद असते. तसेच सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास हळदी मदत करते.

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

-त्वचेसाठी आरोग्यदायी: हळदीला काळी मिरीसोबत मिसळल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते आणि जळजळ कमी होते. हळदीचे पाणी त्वचेचा रंग सुधारण्यास आणि मुरुम कमी करण्यास मदत करते.
– वजन कमी करण्यास करते मदत : हळदीत अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करतात.
-यकृताची कार्यक्षमता सुधारते:हळदीचे पाणी यकृताची कार्यक्षमता सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.
हळदीचे पाणी कसे बनवायचे
कोमट पाण्यात चिमूटभर हळद पावडर आणि काळी मिरी पावडर मिसळून काही वेळ उकळा, त्या पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन करा. हळदीचे पाणी दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. गर्भवती असाल तर हळदीचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.







