Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑनलाइन MPSC परीक्षेचा तिढा सुटणार?फडणवीसांचा मोठा निर्णय; विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 16 July 2026, 15:02

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतर, संगणक आधारित परीक्षा (CBT) प्रणाली सध्या तातडीने लागू न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही नवीन ऑनलाईन प्रणाली ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तोपर्यंत एमपीएससीच्या सर्व परीक्षा सध्याच्या जुन्या आणि प्रचलित (ऑफलाईन) पद्धतीनेच घेतल्या जातील.

एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातील उमेदवारांनी जोरदार विरोध केला होता. परीक्षा ऑफलाईनच व्हाव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय भरतीची प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, कोणतीही नवीन परीक्षा पद्धती आणताना प्रशासकीय यंत्रणा आणि विद्यार्थी दोघांनाही तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ही पद्धत थेट लागू न करता 2027 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, याविषयीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडेच असेल.

या निर्णयावर बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इच्छा ऑफलाईन परीक्षेचीच होती. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर केला असून यामुळे लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यात ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक ती यंत्रणा उभारली जाईल आणि टप्प्याटप्प्याने बदल केले जातील. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

पैश्यांचं आमिष दाखवत महिलांना करायला लावत होते 'तसला' प्रकार! पुण्याच्या आलिशान इमारतीत सुरु होतं विकृत कृत्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp