Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 14:59

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. या प्रकरणात नाव गोवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र, हत्येच्या वेळी त्या नक्की कुठे होत्या, या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंबाने आणि ठाकरे गटाने आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मीनाक्षी शिंदे, त्यांचे पती आणि आरोपी हे एका इमारतीखाली एकत्रित दिसले असल्याचा दावादेखील पूर्णेकर यांच्या मुलाने केला होता. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांच्यावर कटाचे आरोप झाले. पुरवणी एफआयआरमध्ये मीनाक्षी शिंदे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर आज मीनाक्षी शिंदे यांनी आरोप फेटाळताना अनेक मुद्यांवर भाष्य केले.

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, “प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नसताना मला केवळ राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात येत आहे. इथे टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सहानुभूती मिळवून आपला पक्ष वाचव-ण्यासाठी ठाण्यात आले होते. मी शिंदे गटात आहे आणि एक महिला आहे, म्हणूनच मला मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. माझे नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान मीनाक्षी शिंदे यांना त्या कुठे होत्या, असा थेट प्रश्न विचारला असता मीनाक्षी शिंदे यांनी त्याविषयी अधिक बोलणे टाळले. “या प्रकरणी पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत. मी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत असून मला जी काही माहिती द्यायची आहे, ती मी थेट पोलिसांनाच चौकशी दरम्यान देणार आहे,” असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

 

आपली बाजू मांडताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, या दुर्दैवी हत्येशी माझा दूरवरचाही संबंध नसताना केवळ राजकीय सूडबुद्धीने माझे नाव गोवले जात आहे.. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मला मुद्दाम टार्गेट केले जात असून माझे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणामुळे ठाण्यातील शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला असून, पोलीस चौकशीत आता नक्की काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21
Next Post

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp