Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“‘आज कुठे गेली होतीस?’ पत्नीवर संशय; पतीचं स्टेटस ठरलं अखेरचं, भर पावसात थरारक कृत्य!”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 July 2026, 12:32

कोल्हापूर : जिल्ह्यातील पेठवडगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची भरदिवसा हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक लाडू कांबळे (वय 34) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने पत्नी अमृता दीपक कांबळे (वय 29) हिचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. या दुर्दैवी घटनेत दोन लहान मुलींच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आरोपी दीपकने हा खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा करण्यापूर्वी दुपारी 2:00 वाजता त्याने आपल्या व्हॉट्सॲपवर ‘आज माझा तरी शेवट नाही तर… पुढच्याचा’ असा धमकीवजा स्टेटस ठेवला होता. यानंतर काही तासांतच त्याने या क्रूर कृत्याला अंजाम दिला.

बुधवारी दुपारी 4:15 च्या सुमारास अमृता काही कामानिमित्त पेठवडगाव येथील एस.टी. स्टँडजवळ वकिलांना भेटायला आल्या होत्या. तिथे पोहोचलेल्या दीपकने त्यांच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. अमृता यांनी मुलांची शपथ घेत स्वतःचा निर्दोषत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या दीपकने त्यांच्यावर धारदार शस्त्राने 6 ते 8 वार केले. गंभीर दुखापतीमुळे अमृता यांचा जागीच मृत्यू झाला.

हा वाद सुरू असताना स्थानिक लोकांनी अमृता यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘हा आमचा कौटुंबिक वाद आहे, कोणीही मध्ये पडू नका’ अशी दमबाजी दीपकने उपस्थितांना केली. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने हत्यार जवळच्या गटारात फेकून दिले आणि तिथून पळ काढला.

 

या भयंकर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी आरोपी पती दीपक कांबळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. वर्ष 2016 मध्ये या दोघांचा आंतरजातीय विवाह झाला होता, मात्र संशयाच्या भूतपायी एका सुखी संसाराचा असा करुण अंत झाला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

Betalingssamarbeid Felicebet Casino Knytter til Stabil Leverandør for Norge

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp