Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उजनी धरणातून सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी गती! मोठ्या प्रकल्पाची तयारी; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची महत्त्वपूर्ण माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 31 October 2026, 12:21

सोलापूर : जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन डेटा सेंटर, बॅटरी स्टोरेज आणि तरंगत्या सौरऊर्जा (फ्लोटिंग सोलर ) प्रकल्पावरून सुरू असलेल्या चर्चा आणि शंकांवर प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या माहितीनुसार, 16 एप्रिल 2026 रोजी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सामंजस्य करार झाला असून, यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक व तंत्रज्ञान विकासाला नवी गती मिळणार आहे.

प्रकल्पाबाबत पाण्याचा अपव्यय, शेतीचे नुकसान आणि विस्थापनाबाबत अनेक गैरसमज पसरले होते. मात्र, प्रशासनाने हे सर्व फेटाळून लावले आहे. उजनीच्या एकूण 33 हजार 630 हेक्टर जलक्षेत्रापैकी केवळ 9 टक्के (सुमारे 3 हजार हेक्टर) क्षेत्रावरच हा सौर प्रकल्प उभारला जाणार आहे. उर्वरित 91 टक्के जलक्षेत्र पूर्णपणे खुले राहिल्यामुळे मासेमारी आणि जलचरांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. तसेच, बाष्पीभवन कमी होऊन याद्वारे दरवर्षी सुमारे 1.5 टीएमसी पाण्याची बचत होण्याचा अंदाज आहे.

पाण्याच्या वापराबाबत बोलताना प्रशासनाने स्पष्ट केले की, या प्रकल्पासाठी दरवर्षी केवळ 0.42 ते 0.5 टीएमसी पाण्याचीच गरज भासणार आहे. डेटा सेंटरमध्ये ‘क्लोज्ड लूप’ तंत्रज्ञानामुळे पाणी बंद पाईपमध्येच राहिल, ज्यामुळे धरणातील किंवा नदीतील पिण्याच्या पाण्याच्या वितरणात कोणतीही कपात केली जाणार नाही. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांचे पाणी धोक्यात येईल ही भीती पूर्णपणे निराधार आहे.

या प्रकल्पांतर्गत भीमानगर येथील सुमारे 40 वर्षे प्रलंबित असलेला 311 कुटुंबांचा जागेचा प्रश्न सुटला असून, त्यांना 51.18 एकर जागा विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणत्याही खासगी घरांचे विस्थापन होणार नाही. तसेच, या प्रकल्पात अणुऊर्जा किंवा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प समाविष्ट नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थानिक तरुणांसाठी ही मोठी संधी असून याद्वारे सुमारे 2 हजार 800 कायमस्वरूपी आणि 40 हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला दरवर्षी 180 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळून धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होईल. नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी लवकरच विशेष समन्वय यंत्रणा स्थापन केली जाणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘बाजूला व्हा’ म्हणणं पडलं महागात! पुण्यात न्यायालय परिसरात वकिलाला चौघांकडून मारहाण

Sunday, 1 November 2026, 15:45

पुण्यात पाणी गळतीचा अजब निषेध; रस्त्यावरच साबण-शॅम्पू लावून आंघोळ करत नागरिकांनी केलं अनोखं आंदोलन

Sunday, 1 November 2026, 15:38

रेशन कार्डधारकांच्या खात्यात येणार 9,000 रुपये? सुनेत्रा पवारांच्या नावाने व्हायरल मेसेजमागचं सत्य उघड!

Sunday, 1 November 2026, 15:27

‘ही शेवटची भेट, आता भेटू पुढच्या जन्मी’; मित्रांना अखेरचा मेसेज, पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून आत्महत्या; कारण ऐकून बसेल धक्का

Sunday, 1 November 2026, 15:18

सोनं खरेदीची घाई करताय? जानेवारीत उच्चांक, आता मोठी घसरण; दिवाळीला भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Sunday, 1 November 2026, 15:00

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! तरुणाने चोरून काढले महिलांचे व्हिडिओ; प्रकार उघड होताच …..

Sunday, 1 November 2026, 14:59
Next Post

शिरूर नगरपरिषदेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत! मितेश गादिया यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर; 'नितीन पाचर्णे' होणार उपनगराध्यक्ष?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp