Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर रोडवर ऑइल गळतीने दुचाकीस्वारांची घसरगुंडी; लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 17 September 2026, 11:55

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ताम्हणे वस्ती ते थेऊर फाटा या दरम्यान ऑइल टँकरमधून गळती झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाल्याची घटना गुरुवारी (ता. 17) पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रस्ता सुरक्षित केल्याने मोठा अनर्थ टळला.

थेऊर फाटा चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस हवालदार उमेश ढाकणे यांनी रस्त्यावर तेल सांडल्याचे निदर्शनास येताच तातडीने सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी बॅरिकेड्स लावले. वाहतूक एका बाजूने सुरू ठेवत वाहनचालकांना सावधपणे मार्ग करून दिला. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे होणारा संभाव्य मोठा अपघात टाळण्यात यश आले.

या घटनेची माहिती मिळताच, वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावर सांडलेले तेल पाण्याने धुऊन काढले. तसेच, आवश्यक ठिकाणी रसायनाचा वापर करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.

या घटनेमुळे पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना सावध केले. तेल सांडल्यामुळे काही दुचाकी घसरून पडल्याचेही त्यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया

पुणे-सोलापूर रोडवर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, त्यावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी या मार्गावर अग्निशमन दलाचे वाहन आणि रुग्णवाहिका उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहून या मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करावी. अपघाताच्या वेळी वेळेत मदत न मिळाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते.

— सचिन तुपे, माजी सरपंच, कुंजीरवाडी (ता. हवेली)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्नीला पतीच्या चारित्र्यावर संशय अन् डोकं-छाती, बरगड्यांवर हातोडीने केले वार, पिंपरीतील घटनेने खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:08

BAMS डॉक्टराच्या मृत्यूचं गूढ वाढलं! पोलिसांच्या तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

Thursday, 17 September 2026, 13:03

“लाडकी बहीण” योजनेत 5,000 कोटींचा मुद्दा; सुप्रिया सुळेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, श्वेतपत्रिकेची मागणी!

Thursday, 17 September 2026, 12:45

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, 5 ऑक्टोबरनंतरचे सर्व पंचनामे करू; फडणवीसांचं मोठं आश्वासन

Thursday, 17 September 2026, 12:31

परिस्थितीच्या काटेरी वाटेवरून स्वप्नांच्या आकाशाकडे तक्रारवाडीच्या धनश्रीची झेप!

Thursday, 17 September 2026, 12:21

Loni Kalbhor News: फिरायला नेण्याच्या बहाण्याने दहावीच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; तरुणावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल

Thursday, 17 September 2026, 12:09
Next Post

भोरच्या इतिहासापासून बेरोजगारीपर्यंतची कहाणी; सम्राट तरुण मंडळाचा जिवंत देखावा ठरतोय आकर्षण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp