लहू चव्हाण
पांचगणी : पर्यटननगरी पाचगणी शहरात तीन दिवसीय ‘आय लव्ह पांचगणी’ फेस्टिवल कालावधीत होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे शहरातील वाहतूकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पागणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.
या वर्षी( ता.२ ते ४ ) डिसेंबर रोजी पाचगणी फेस्टिवल आयोजीत केला असुन सदर उत्सवात पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्याचबरोबर पाचगणी-महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहणाचीही संख्या मोठया प्रमाणात असल्याने वरील कालावधी पोलीस अधिक्षक सातारा यांच्या आदेशानुसार वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
१) महाबळेश्वर बाजुकडुन वाई बाजुकडे जाणारी वाहतुक एस.टी. स्टॅण्ड चौक पांचगणी मार्गे राहिल प्लाझा हॉटेल-टेबल लॅण्ड कॉर्नर अपना हॉटेल-भिमनगर जुने पोलीस ठाणे ते – मेन रोड.
२) वाई बाजुकडुन महाबळेश्वर बाजुकडे जाणारी वाहतुक :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान – शॉलम हायस्कुल – न्युईरा हायस्कुल पांचगणी मार्गे रश्मी चौक ते मेन रोड.असा बदल करण्यात आला आहे.
वरील नियमाचे उल्लघंन केलेस महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश पवार यांनी दिली.