Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 13 September 2026, 12:23

मंचर : पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून नातेवाइकाला भेटण्यासाठी निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला. पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर बायपासच्या मोरडेवाडी हद्दीत भरधाव इको मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या सुमारे 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला. आनंदराव शंकर कोळेकर (वय-53, रा. करंजविहिरे) आणि किरण बाबुराव डुंबरे (वय 35, रा. दावडी) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण डुंबरे यांनी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी करंजविहिरे येथे माहेरी सोडले होते. त्यानंतर ते नातेवाईक आनंदराव कोळेकर यांच्यासोबत आळेफाटा येथे उपचार घेत असलेल्या एका नातेवाइकाला भेटण्यासाठी इको मोटारीने निघाले होते. त्यांची इको मोटार एमएच 14 एचडब्ल्यू 4327 क्रमांकाची होती.

मोरडेवाडी हद्दीत आल्यानंतर इको मोटारीवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर मोटार रस्त्यालगतच्या सुमारे 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की, मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच विजय तांबडे, संतोष ढमाले यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील दोघांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांनाही मृत घोषित केले.

दरम्यान, पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सुखरूप सोडून काही वेळातच किरण डुंबरे यांच्यावर काळाने झडप घातली. कुटुंबीयांसाठी आनंदाचा क्षण जवळ आलेला असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 12:23

जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी लंपास; महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Sunday, 13 September 2026, 11:53

उरुळी कांचन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च ,गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, ‘रूटमार्च’ काढत आवाहन

Sunday, 13 September 2026, 11:40

शिंदवणे येथे कौटुंबिक वादातून मेव्हण्याची जावयाला दगडाने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा

Sunday, 13 September 2026, 11:25

मुंबईत 5 हजार समर्थकांना परवानगी द्या! ‘सर्व अटी पाळू’ म्हणत मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा अर्ज; सरकार काय निर्णय घेणार?

Sunday, 13 September 2026, 11:21

गोठ्यात घुसून वासराचा फडशा; मांजरी खुर्दमध्ये बिबट्याची दहशत

Sunday, 13 September 2026, 10:36
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp