Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वातंत्र्य दिनीच काळाचा घाला ; खेळता खेळता नव्याने खोदलेल्या विहिरीत पडून 12 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू ; कस्तुरी प्रतिष्ठानच्या मदतीने मृतदेह बाहेर, परिसरात हळहळ…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 15 August 2026, 21:29

उरुळी कांचन : एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे दौंड तालुक्यातील बोरीऐंदी परिसरात एका अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेने शोककळा पसरली आहे. विहिरीच्या बाजूला मित्रांसोबत खेळत असताना 12 वर्षांचा मुलग्याचा तुडुंब भरलेल्या विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. 15) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

आकाश लखन घोर (वय 12, मूळ रा. भोपालपूर, ता. देवरी, जि. सागर, मध्य प्रदेश; सध्या रा. बोरीऐंदी, ता. दौंड) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आकाश याचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी मध्य प्रदेशातून बोरीऐंदी परिसरात आले असून, ते येथील एका स्थानिक कंपनीत मजुरीचे काम करतात. ते राहत असलेल्या परिसरातच काही दिवसांपूर्वी एका नवीन विहिरीचे काम पूर्ण झाले होते. सद्या पडणाऱ्या पावसामुळे ही विहीर पाण्याने तुडुंब भरली होती.

शनिवारी सायंकाळी आकाश हा आपल्या मित्रांसोबत या विहिरीच्या परिसरात खेळत होता. खेळत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो खोल विहिरीत कोसळला. सोबत खेळणाऱ्या मित्रांच्या डोळ्यांसमोरच आकाश पाण्यात बुडू लागल्याने लहान मुलांची मोठी भंबेरी उडाली. त्यांनी तात्काळ पळत जाऊन कंपनीत काम करत असलेल्या आकाशच्या आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच बोरीऐंदी परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, विहिरीत पाण्याचा साठा प्रचंड असल्याने आणि विहीर खोल असल्याने मुलाचा शोध घेण्यात मोठे अडथळे येत होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून ‘कस्तुरी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, घनश्याम मेमाणे, कौस्तुभ मेमाणे, अथर्व मेमाणे, रतन चव्हाण, संतोष झोंबडे, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विलंब न करता विशेष मशीनच्या साहाय्याने विहिरीच्या पात्रात शोधमोहीम राबवून अवघ्या पाच मिनिटांत आकाशचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

दरम्यान, विहिरीतून बाहेर काढल्यानंतर आकाशला तातडीने उपचारासाठी यवत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच परप्रांतीय मजूर कुटुंबातील 12 वर्षांच्या चिमुकल्याचा असा करुण अंत झाल्याने यवत व बोरीऐंदी परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02
Next Post

फार्महाऊसवर सुरू होता ‘भयंकर’ प्रकार; पोलिसांची धाड पडताच उडाली पळापळ, 8 महिलांसह 22 जण ताब्यात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp