Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सकल मराठा आरक्षण महामोर्चा संदर्भात शांतता कमिटीची बैठक संपन्न..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 19:48

सुरेश घाडगे

परंडा : परंडा येथे आयोजित मंगळवार ( दि.८ ) सकल मराठा आरक्षण महामोर्चा संदर्भात शांतता कमिटीची बैठक परंडा पोलीस ठाण्यात बुधवार ( दि. २ ) घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे, पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, तहसिलदार रेणुकादास देवणीकर, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे, पोलीस उपनिरिक्षक विक्रांत हिंगे, बांधकाम उपविभाग अभियंता जालींदर मळगीकर, वैद्यकिय अधिकारी डॉ . देवदत्त कुलकर्णी, परंडा आगारप्रमुख राहुल वाघमोडे, नगर परिषद मुख्याधिकारी मनिषा वडिपल्ले, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, महावितरण अधिकारी आदिसह सकल मराठा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

लाख ते सव्वा लाख संख्येने या महामोर्चात समाज एकवटेल असा अंदाज या बैठकीत करण्यात आला. त्या अनुषंगाने सर्व नियोजन प्रचार- प्रसार झाला असून सध्या सुरूच आहे. आम्ही प्रशासनाला सर्वोत्परी सहकार्य करू असे आश्वासन सकल मराठा समितीच्या पदाधिकाऱयांनी यावेळी दिले.मोर्चात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख राहील. मोर्चा शांततेत व वेळेत होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे यांनी केले.

 

मोर्चा मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच धुळ उडू नये यासाठी मुरुम – माती टाकलेल्या रस्त्यावर मोर्चा दिवशी सकाळी पाणी मारावे . मोर्चा मार्गावरील अडचण- अडथळे काढून मार्गावर स्वच्छता करावी, फिरते शौचालय, आग्निशमक वाहन ठेवावे, आदि सूचना परंडा नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना करण्यात आल्या.

मोर्चा दरम्यान बस वाहतूक तसेच ऊस वाहतूक व अवजड वाहने बंद ठेवावीत व त्याबरोबरीने मोर्चा मार्गावर कोणतेही दुचाकी व चारचाकी वाहनासह सहभागी होऊ नये. बार्शी रोड, कुर्डूवाडी रोड, करमाळा, सोनारी रोड आदी त्या त्या मार्गाजवळ वाहन तळ असेल. अम्बुलंस व आरोग्य सेवा सज्ज असेल. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल. तसेच मोर्चा मार्गावरील विद्युत तारा व पोल याची पहाणी व दुरुस्ती केली जाईल. अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱयांनी दिली.

दरम्यान, गावोगावी बैठका घेत मोर्च्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. विविध संघ -संघटनाकडून पाठिंबा मिळत असून तालुक्यातील ९६ गावात मराठा समाजाच्या बैठका घेवून जनजागृती करण्यात आली आहे. महिला वर्गांच्या देखील स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या आहेत. महामोर्चा आठवडी बाजार स्थळ येथून मंगळवार दि .८ रोजी सकाळी ११ वाजता निघणार असून तहसील कार्यालयानजिक रुई रोड जवळील मैदानावर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

पतीने दिलेले 'आश्वासन' पत्नीने पूर्ण केले, वाढदिवसाच्या खर्चातून स्मशानभूमीची निर्मिती ; उरुळी कांचन येथील माजी उपसभापती हेमलता बडेकर यांचा उपक्रम..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.