Monday, November 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यातील 1405 गावांचा चेहरामोहरा बदलणार! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा ॲक्शन प्लॅन, प्रत्येक गावात 2 कामे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 November 2026, 15:55

पुणे : पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्ही. बी. जी. राम जी. योजनेंतर्गत जलसंधारणाचा विशेष आराखडा तयार केला असून, जिल्ह्यातील 1405 ग्रामपंचायतींना विविध कामांचे उद्दिष्ट दिले आहे. केवळ टँकरवर अवलंबून न राहता गावपातळीवरच भूजल पातळी वाढविण्याचा यामागे मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेत प्रामुख्याने शोषखड्डे तयार करणे, विहिरींचे पुनर्भरण करणे, नाले सरळ आणि खोल करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तसेच पाणंद रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय आकडेवारीनुसार, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नाडेप आणि गांडूळ खत प्रकल्पांसाठी प्रत्येकी 14,050 कामे करण्याचे ठरले आहे. याशिवाय 4215 ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि 1405 पाणंद रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

मृद व जलसंधारण विभागामार्फत पाझर तलावांमधील गाळ काढणे, तलावांची दुरुस्ती, दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्चर, कंपार्टमेंट बंडिंग आणि माती नाला बांध ही कामे होणार आहेत. प्रत्येक गावात अशी किमान दोन कामे करण्याचे निश्चित करून, एकूण 2810 कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तलावांमधील गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढेल, तर नाले खोलीकरणामुळे भूजल पातळी उंचावण्यास मोठी मदत होईल.

या सर्व कामांच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत, कृषी, लघुपाटबंधारे, बांधकाम, वन आणि सामाजिक वनीकरण विभागाची महत्त्वाची आढावा बैठक घेतली. प्रत्येक गावाने तेथील गरजेनुसार कामांचे नियोजन करावे अशा सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, या जलसंधारणाच्या कामांमुळे टंचाई तर दूर होईलच, पण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोनं डायरेक्ट ५ लाखांवर जाणार? तज्ज्ञांच्या अंदाजाने खळबळ; चांदीच्या दरांबाबतही मोठी भविष्यवाणी

Monday, 9 November 2026, 11:02

राज्यातलं हवामान बदललं! दिवस ऊन अन् रात्री गारवा; जाणून घ्या तुमच्या भागातील ताज्या हवामानाचा अंदाज

Monday, 9 November 2026, 10:25

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45
Next Post

पुण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई! वर्षभरापासून फरार असलेला आरोपी जेरबंद; ४ लाख ४३ हजारांचा गांजा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp