मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांची याचिका फेटाळल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 14 डिसेंबर 2025 रोजी हे जात प्रमाणपत्र मिळवले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते काढले असून, त्यापूर्वी त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाकडेही अशी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती.आता
ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांची याचिका फेटाळल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता संबंधित प्रभागातून प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपदाची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचे पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जात प्रमाणपत्र किंवा इतर कायदेशीर कारणांमुळे पालिकेतील एकूण 227 पैकी चार नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. यामध्ये खालील नगरसेवकांचा समावेश आहे:

रोशन शेख (एमआयएम – प्रभाग 138)
दीपक राजाराम सावंत (ठाकरे गट – प्रभाग 111)
शमीर रमजान पटेल (एमआयएम – प्रभाग 137)
बुशरा कप्तान मलिक (राष्ट्रवादी – प्रभाग 170)
विशेष म्हणजे, या रिक्त झालेल्या चारही जागांवर अद्याप कोणत्याही नवीन नगरसेवकांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता विशाखा राऊत यांच्या प्रकरणामुळे पालिकेतील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे.






