Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पळून जाऊन लग्न केलं पण मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ; ३ वर्षाच्या चिमुकलीला सोडून आईने दिला जीव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 June 2025, 15:34

सोलापूर: राज्यभरात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असतानाच, सोलापूरमधूनही एक संतापजनक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले (वय २२) या विवाहितेने सासरच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रेमविवाह, पण पुढे सुरु झाला छळ

आशाराणी हिचा विवाह तिच्या मोठ्या बहिणीच्या दीराशी म्हणजेच पवन भोसले याच्याशी २०१९ साली प्रेमविवाहाद्वारे झाला होता. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना वैष्णवी नावाची चिमुकली मुलगी झाली. मात्र, त्यानंतरच आशाराणीचा छळ सुरू झाला. चारचाकी वाहन आणि पैशाच्या मागणीसाठी नवऱ्याने सतत मारहाण केली, तसेच सासू-सासऱ्यांनीही ‘स्वयंपाक येत नाही’, ‘सासरच्या माणसांची इज्जत करत नाही’ असे म्हणत मानसिक त्रास दिला.

माहेरी तक्रार, पण पुन्हा सासरी पाठवले

 

२०२४ मध्ये सततच्या मारहाणीला कंटाळून आशाराणी माहेरी रायचूर येथे आली होती. त्यावेळी पतीने तिच्यावर नांदायला येत नसल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी समुपदेशन करत दोघांची समजूत काढली आणि आशाराणी पुन्हा सासरी परत गेली. मात्र वर्षभराच्या आतच, मंगळवारी (३ जून २०२५) तिने गळफास लावून आयुष्य संपवले.

दुसऱ्यांदा गरोदर, तरीही थांबला नाही छळ

मुलगी वैष्णवी केवळ तीन वर्षांची असून आशाराणी दुसऱ्यांदा गरोदर होती. तरीही तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरूच होता. वडील नागराज डोणे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पती पवनने तिला सतत पैसे आणण्यास भाग पाडले, व्हिडिओ कॉलवर मारहाण केली, तर सासू-सासरेही तिला कमी लेखायचे.यासंदर्भात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले या तिघांनाही अटक केली आहे. त्यांच्या विरोधात BNS कलम 80(2), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलांवरील वाढते अत्याचार ही समाजासाठी गंभीर बाब

ही घटना म्हणजे फक्त आशाराणीच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या रोजच्या संघर्षाचं एक उदाहरण आहे. हुंडा बंदी कायदा असूनही अजूनही समाजात हुंड्यासाठी होणारा छळ, अत्याचार आणि आत्महत्या थांबत नाहीत. फक्त कायद्यानं नाही, तर समाजानंही बदल व्हायला हवा, ही वेळ आहे की आपण जागरूक होऊन या प्रश्नावर एकजूटीनं आवाज उठवण्याची!

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54

लोणी काळभोर येथे महालक्ष्मी देवीच्या गळ्यातील 10 लाखांचं सोन्याचं गंठण गायब; परिचित महिलेवर चोरीचा संशय

Saturday, 24 October 2026, 10:42

Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 10:37

एमआयटी कॉलेजमध्ये गेली अन् अचानक गायब! लोणी काळभोर येथील 20 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Saturday, 24 October 2026, 10:28
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होणार; बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार भव्य मेळावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp