Sunday, November 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, दिवाळीत बांधकाम सुरू ठेवणार असाल तर सावधान! महापालिकेचे कडक आदेश; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 November 2026, 16:52

पुणे : दिवाळीच्या सुटीत शहरातील विकासकामे सुरू ठेवण्यासाठी पुणे महापालिकेने कडक नियमावली लागू केली आहे. सुटीच्या काळात मजूर गावी जात असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामे उरकताना दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी हे निर्देश दिले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शहरात सध्या रस्ते, पूल, इमारती आणि इतर पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरू आहेत. सणासुदीच्या दिवसांत कामगारांची कमतरता भासते, तसेच साहित्य आणि सुरक्षा साधनांची वानवा असते. अशा स्थितीत धोकादायक पद्धतीने कामे सुरू ठेवू नयेत, यासाठी प्रशासनाने 16 अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे.

नवीन आदेशानुसार, प्रत्येक बांधकाम स्थळाची दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश कनिष्ठ, उप आणि कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. साइटवर योग्य बॅरिकेडिंग करणे, वाहन आणि नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग तयार करणे, खड्डे व्यवस्थित झाकणे तसेच रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि ब्लिंकर बसवणे आवश्यक आहे. कामगारांसाठी हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट आणि जॅकेट यांसारखी सर्व सुरक्षा साधने देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रत्येक ठिकाणी जबाबदार पर्यवेक्षक असणे गरजेचे आहे. जर आवश्यक मनुष्यबळ किंवा सुरक्षा साहित्य उपलब्ध नसेल, तर काम तातडीने थांबवून ती जागा सुरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या या सर्व अटींची पूर्तता केल्याशिवाय कामांना परवानगी मिळणार नाही. नियमांकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवले आणि एखादा अपघात घडल्यास, त्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी संबंधित कंत्राटदार आणि महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांवर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13
Next Post

एमपीएससी गट-क पूर्व परीक्षेसाठी १६,७१७ पदांची महाभरती! उमेदवारांना वयोमर्यादेत १ वर्षाची सूट; १३ नोव्हेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp