पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune News) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पत्रकार परिषद (Shivsena) पुण्यात झाली. या पत्रकार (Ravindra Dhangekar) परिषदमध्ये महानगर प्रमुख (Eknath Shinde) रवींद्र धंगेकर यांनी पक्षाकडून सर्व 165 जागांवर उमेदवार उतरण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया पक्ष कार्यालयात सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

धंगेकरांचा महत्वाचा निर्णय
धंगेकर यांनी यावेळी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आगामी महापालिका निवडणुकीत ते स्वतः उमेदवारी न भरता आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही आपल्या मुलाला महापालिकेच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पुण्यात अनेक नेत्यांची पुढची पिढी निवडणुकीत सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. (Marathi News)
शिंदेंच्या आदेशानंतर अधिकृत घोषणा
धंगेकर म्हणाले की शिवसेनेकडून सर्व 165 विभागांमध्ये तयारी पूर्ण आहे. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर अधिकृत घोषणा होईल. युतीबाबतचा निर्णय मात्र शिंदे आणि इतर पक्षातील वरिष्ठ नेते घेतील. पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना स्वबळावर लढेल, तर युतीचा निर्णय झाल्यास त्यानुसार निवडणूक लढवली जाईल, असे त्यांनी सांगितले. (Breaking News)
काही माध्यमांमध्ये भाजपकडून शिवसेनेला युतीत 30 जागा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र इतक्या कमी जागांवर आम्ही युती मान्य करणार नाही, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले. तरीही युतीमध्ये किती जागांवर चर्चा होईल याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
पुणे महापालिका निवडणुकीत पक्षाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न विचारल्यावर धंगेकर म्हणाले की एकनाथ शिंदेच पुण्यातील निवडणुकीचे प्रमुख चेहरे असतील. तसेच महापालिकेची जबाबदारी कोणाकडे असेल, याबाबतचा निर्णय शिंदे पुढील दोन दिवसांत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. Pune महानगरपालिकेत अनेक नेत्यांची मुले उतरतील, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.







