पुणे: मुंढवा येथील शासकीय (Pune Land Scam) जमीन गैरव्यवहार (Parth Pawar) प्रकरणातील मुख्य (Ajit Pawar) आरोपींपैकी एक असलेल्या शीतल किसनचंद (Sheetal Tejwani) तेजवानी हिला सोमवारी न्यायालयाने (Mundhawa Land Scam) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, तेजवानीने जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्या अर्जावर 19 डिसेंबर रोजी तपास अधिकारी न्यायालयात आपले म्हणणे सादर करणार आहेत. (Breaking News)

तेजवानी न्यायालयात हजर
मुंढवा येथील बोटॅनिकल गार्डनची सुमारे 40 एकर शासकीय जमीन परस्पर अमेडिया कंपनीला विकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीत पार्थ पवार यांची भागीदारी आहे. या प्रकरणात कथित कुलमुखत्यार शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह इतरांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेजवानीची पोलिस कोठडी संपल्याने तिला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. (Latest Marathi News)
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे यांनी तपासातील प्रगती न्यायालयासमोर मांडली. मात्र, आरोपी तपासाला सहकार्य करत नसल्याचा दावा सरकारी वकील अमित यादव यांनी केला. त्यामुळे तेजवानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली, ती न्यायालयाने मान्य केली. (Pune Crime)
सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा
दरम्यान, मुंढवा येथील शासकीय जमीन अमेडिया कंपनीला विकताना सुमारे 6 कोटी रुपये मुद्रांक शुल्क बुडवून राज्य सरकारची फसवणूक केल्याचा स्वतंत्र गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणातही तेजवानीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, बावधन पोलिसांनी न्यायालयात प्रॉडक्शन वॉरंटचा अर्ज सादर केला आहे. (Marathi Batmya)
दिग्विजय पाटीलला अटक
या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार असलेला मामेभाऊ दिग्विजय पाटील सोमवारी अखेर बावधन पोलिसांसमोर हजर झाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. तसेच या व्यवहारातील दस्त नोंदणी स्वींद्र तारू याच्या अधिकारात झाल्याने त्याला 7 डिसेंबर रोजी भोर येथील घरातून अटक करण्यात आली असून, त्याची पोलिस कोठडी न्यायालयाने शुक्रवारपर्यंत वाढवली आहे.






