Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: दिवसा बँकेत नोकरी अन् रात्री घेत होता मटक्याचे आकडे; पुण्यातील तरुणांसह 39 जणांवर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 September 2025, 19:15
He worked in a bank during the day and was taking matka numbers at night; Case registered against 39 people including youth from Pune

Photo-Social Media

पुणे : दिवसभर बँकेत नोकरी करणारा उच्चशिक्षित तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटका जुगाराचे (Pune Crime) आकडे घेत असल्याचे उघड झाले आहे. खडक पोलिसांनी (Pune Police) गुरुवारी (25 सप्टेंबर) रात्री घोरपडी पेठेतील निळू फुले जलतरण तलावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धाड टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी बँकेत कार्यरत असलेला राहुल दिलीपसिंग परदेशी (वय 42, रा. बेनकर वस्ती, स्वामी समर्थ अपार्टमेंट, धायरी गाव) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत ऑनलाईन मटका खेळणाऱ्या 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपासात उघड झाले की, बी.कॉम शिक्षण घेतलेला राहुल परदेशी हा दिवसा बँकेत नोकरी करत असला तरी रात्री मात्र मटक्याचे आकडे घेऊन जुगाराचा कारभार करीत होता. तो सुरज ज्ञानेश्वर गायकवाड या व्यक्तीसाठी आकडे घेत होता.

 

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विशाल शेडगे (रा. लोहियानगर), सुरज गायकवाड (रा. खडकमाळ आळी), मुकेश सातपुते (रा. पानघंटी चौक), प्रतीक बनकर (रा. झगडेवाडी), विजयसिंग परदेशी उर्फ मामा (रा. घोरपडी पेठ), शिवा धनगर (रा. पद्मावती), सुनिल वाघ (रा. सिंहगड रोड), बालाजी गट्डे (रा. सदाशिव पेठ), सचिन सुपेकर (रा. पर्वती दर्शन), सचिन पालवे (रा. शिवतेजनगर, कोथरूड), विलास दिवाणे (रा. खडकमाळ आळी, राठी वाडा), रहीम शेख (रा. एम. जी. रोड, कॅम्प), शुभम गोडसे, अन्ना शिंदे (रा. बिबवेवाडी), शुभम कामदुले (रा. खडकमाळ आळी) व अक्षय तेलवडे अशी नावे समाविष्ट आहेत.

खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार आशिष जाधव आणि इरफान नदाफ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निळू फुले जलतरण तलावाजवळ एक व्यक्ती मोबाईलवर मटक्याचे आकडे घेत आहे. सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून राहुल परदेशीला पकडले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून 562 रुपये रोख, मोबाईल असा एकूण 3562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप तपासल्यावर 17 जणांकडून आकडे मागवून ऑनलाईन बुकींग घेतल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत राहुल परदेशीने कबूल केले की, तो व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना मटक्याचे आकडे पाठवतो व त्याबदल्यात रोख रक्कम तसेच मनी ट्रान्सफर अ‍ॅप्सद्वारे पैसे घेतो.

या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव पुढील तपास करत आहेत. या घटनेने शिक्षण घेतलेला, बँकेत नोकरी करणारा तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27
Next Post

Crime News : 'आम्ही पोलिसांना टीप देतो', म्हणत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.