पुणे: घरफोडी करुन परराज्यात धुम (Pune Crime) स्टाईलने पळून जाणाऱ्या तीन (Pune News) अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी 24 तासाच्या आत वाकी चाकण (ता. खेड) येथून अटक केली आहे. पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (PCMC News)

मौसीन शौकतअली शेख (वय-32 रा. लोहियानगर सत्यकम, स्कुल जवळ, एम ब्लॉक, मेरठ उत्तर प्रदेश), उदयवीर मलखानसिंग सहासी (वय 36 रा. गल्ली नं 3 प्रतापनगर, जयभिम नगर, मेरठ उत्तर प्रदेश) व विनय कुमार गंगासरन (वय 34, रा. ग्राम बिजोली ठाणा, खरखोदा, मेरठ, उत्तर प्रदेशम) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Breaking News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून दिघी, चाकण, सांगावी व काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घरांना वारंवार घडत होत्या. सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या होत्या. मिळालेल्या आदेशानुसार पथक हे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, पथकातील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना चाकण येथे एका पांढऱ्या रंगाच्या टाटा टैम्पोमध्ये एक विना नंबरची दुचाकी गाडी व समोर कैबिनमध्ये तीन इसम संशयीतरित्या बसले आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. (Marathi Batmya)
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, वरील तीनही इसमांनी येथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम, घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहीत्य, टेम्पो मध्ये विना नंबरची दुचाकी असे मिळून आले. (Marathi News)
दरम्यान, पोलिसांनी सोनेचांदीचे दागिने व रकमेबाबत चौकशी केली असता, आरोपींनी मेरठ (उत्तर प्रदेश) येथून एका चारवाकी वाहनामध्ये दुचाकी घेवुन पिंपरी चिंचवड शहर येथे येवुन घरफोडी करुन परत 100 ते 150 किलोमिटर पोलीसांना समजु नये व थांगपत्ता लागु म्हणून दुचाकीवर जातो व त्यानंतर निर्जनस्थळी दुचाकी ही टेम्पो मध्ये टाकुन मेरठ येथे माघारी निघुन जातो असे सांगीतले. आरोपींकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर , अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार , सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोन्हाडे, सागर सुर्यवंशी, श्रीधन इचके, संदिप सोनवणे, मनोज साबळे, रुषीकेश मोसुरे, अजित रुपनवर, स्वप्निल महाले, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, समिर काळे, सुधिर दांगट, दिलीप राठोड, तुषार बराडे, राजकुमार इधारे, निखील फापाळे, प्रदीप राळे यांच्या पथकाने केली आहे.







