Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात राजकीय वाद पेटला! गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेची पाद्यपूजा; व्हायरल फोटोने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 July 2026, 13:19

पुणे : पुणे शहरातील सुखसागर नगर भागातील एका महापालिका शाळेत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. शाळेतील लहान मुलांकडून भाजपच्या महिला नगरसेविका वर्षा साठे यांचे पाय धुवून पाद्यपूजा करून घेण्यात आली. या प्रसंगाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमासाठी साठे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचे चरणप्रक्षालन केल्याचे उघडकीस आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी अतिशय कडक शब्दांत विरोध दर्शवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शाळा हे ज्ञान, समता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणारे ठिकाण आहे.ते कोणत्याही व्यक्तीच्या पूजेचे स्थान बनता कामा नये.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके, पेन आणि संविधान असायला हवे, लोकप्रतिनिधींची पूजा करण्याची पद्धत नव्हे…” अमोल परदेशी

 

शाळकरी बालकांकडून लोकप्रतिनिधीचे चरण धुवून घेणे हे संविधानात्मक मूल्यांना हरताळ फासणारे असून संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेला कलंक लावणारे आहे, असा आरोपही परदेशी यांनी केला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी. तसेच, भविष्यात अशा घटनांचे पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने तातडीने नियम तयार करावेत, अशी मागणी पुढे आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महापालिका अतिक्रमण कारवाईला विरोध; तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 13:47

उजनीत अवैध वाळू माफियांच्या तीन बोटींवर महसूल विभागाचा घाव; जिलेटिनच्या साह्याने जलसमाधी

Tuesday, 6 October 2026, 13:41

पती घरातून बाहेर पडला अन् घरात घडला अनर्थ! आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Tuesday, 6 October 2026, 13:38

लोणी काळभोरमध्ये कत्तलीसाठी जर्शी गाय घेऊन जाणारा टेम्पो पकडला; दोघे ताब्यात, दोघे पसार

Tuesday, 6 October 2026, 13:31

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत मध्यरात्री चौघांचा गुन्हेगारी कट? पोलिसांना पाहताच तिघांनी ठोकली धूम; अल्पवयीन मुलगा कोयत्यासह जेरबंद

Tuesday, 6 October 2026, 13:24

पाहणी झाली, डागडुजी कधी?भैरवनाथ विद्यालयातील धोकादायक स्लॅबखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण

Tuesday, 6 October 2026, 13:10
Next Post

"हा तर क्रूर विनोद!’ शिक्षणमंत्र्यांची भाजप नेत्याच्या मुलीनेच उडवली खिल्ली; CJPच्या समर्थनार्थ उघड भूमिका"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp