Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर ‘अमिषांचा वर्षाव’ ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 1 August 2026, 16:13

पुणे : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा अद्याप कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसतानाही, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचन व परिसरात राजकीय वातावरण भलतेच तापू लागले आहे. भावी सरपंच आणि वॉर्डस्तरीय सदस्य पदाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचा धडका लावला असून, एकीकडे देवदर्शनाच्या सफरी तर दुसरीकडे एसटीच्या सवलतीची ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड काढून देण्याच्या शिबिरांच्या माध्यमातून ‘पैशाची खैरात’ सुरू केली आहे.

विशेष म्हणजे, या देवदर्शन व शिबिरांच्या बहाण्याने इच्छुकांकडून प्रभागातील प्रत्येक घरातील मतदारांचा फोन नंबर, पत्ता आणि कुटुंबातील सदस्यांच्या संख्येची अद्ययावत माहिती गोळा केली जात आहे. सध्या उरुळी कांचन आणि आसपासच्या ग्रामपंचायत हद्दीत महामंडळाच्या प्रवासासाठी लागणाऱ्या एनसीएमसी स्मार्ट कार्डांसाठी इच्छुकांकडून गावोगावी शिबिरे भरवली जात आहेत. महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना एसटी डेपोत जाऊन तासनतास रांगेत उभे राहून हे कार्ड काढावे लागते.

इच्छुकांनी ही सोय थेट दारात उपलब्ध करून दिल्याने नागरिकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून मतदारांची सर्व वैयक्तिक माहिती अगदी सहज आणि विनासायास गोळा होत असल्याने, निवडणुका जिंकण्यासाठी हा ‘डेटा संकलनाचा’ एक मोठा स्मार्ट फंडा ठरत आहे.

 

ग्रामपंचायत निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले असले, तरी राज्य सरकारच्या विशेष मतदार पडताळणी मोहीम (SIR) अर्जांमुळे अंतिम मतदार यादी तयार होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

निवडणुका लांबल्याने इच्छुकांची गणिते काहीशी बिघडली असली आणि आधीच आयोजित केलेल्या अयोध्या, वाराणसी, उज्जैन, कोकण दर्शन सफरी अडचणीत सापडल्या असल्या, तरी ज्या इच्छुकांनी रेल्वे व ट्रॅव्हल्सचे ॲडव्हान्स बुकिंग केले आहे, त्यांना ऐनवेळी या सफरी रद्द करता येत नाहीत. त्यामुळे महिला मतदारांना ठरलेल्या तारखेनुसार देवदर्शनाला घेऊन जाण्याची तसदी इच्छुकांना घ्यावीच लागत आहे.

निवडणूक थेट कधी जाहीर होणार याची कोणतीही शाश्वती नसताना, केवळ प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे निघून जाईल या भीतीने प्रत्येक इच्छुकाला देवदर्शन, आरोग्य शिबिरे आणि भेटवस्तूंचा धडका सुरूच ठेवावा लागत आहे. निवडणुका जितक्या लांबणीवर पडतील, तितका इच्छुकांचा दरमहा खर्चाचा आकडा फुगत चालल्याने आतून इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत, तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिळणाऱ्या या ‘खातीरदारी’चा नागरिक मात्र चांगलाच आनंद घेत आहेत.

सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण..

पूर्व हवेलीतील बहुतांश गावांचा कारभार हाकण्याची संधी यंदा महिलांना मिळणार आहे. मोठ्या ग्रामपंचायतीपैकी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, थेऊर, कोरेगाव मूळ, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, कोलवडी साष्टे, मांजरी खुर्द, हिंगणगाव, भवरापूरसह अनेक ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण जाहीर झाले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुंडे साहेब, हडपसर ते कुरकुंभ यादरम्यानची हॉटेल्स आणि बेकरी दुकाने एकदा खंगाळा; जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होईल?

Saturday, 1 August 2026, 16:57

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर ‘अमिषांचा वर्षाव’ ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

Saturday, 1 August 2026, 16:13

अभिजीत दिपकेंच्या तब्येतीची चिंता वाढली?डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट

Saturday, 1 August 2026, 15:31

CJP अडचणीत? फॉरेन फंडिंगची होणार सखोल चौकशी; मंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 1 August 2026, 15:10

पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं कारण काय?

Saturday, 1 August 2026, 14:43

“राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखी मोदी-शाहांची जोडी”; पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Saturday, 1 August 2026, 14:07
Next Post

मुंडे साहेब, हडपसर ते कुरकुंभ यादरम्यानची हॉटेल्स आणि बेकरी दुकाने एकदा खंगाळा; जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होईल?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.