Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता लोणी काळभोरमध्येही हलणारा पूल ; काय सांगतात ग्रामस्थ.. वाचा !

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 July 2022, 14:01

लोणी काळभोर : लोणी काळभोर ( ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या रामदरा परिसराकडे जाणारा व ५७ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला नवीन मुठा कालव्यावरील पूल अखेरची घटका मोजत आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या पुलावरून दररोज सुमारे पाच हजार नागरिक येथून ये जा करीत आहेत. त्यामुळे या पूलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य नागेश काळभोर यांनी केली आहे.

 

या संदर्भात लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन दिले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता पल्लवी जोशी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या वेळी नागेश काळभोर यांनी हि मागणी केली.

यावेळी नागेश काळभोर म्हणाले या गर्दीच्या पुलावरून चारचाकी गाडी व एखादे अवजड वाहन गेल्यास हा पूल हलत आहे. हवेली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र असलेल्या रामदरा शिवालय या ठिकाणी जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते. त्यामुळे दररोज सुमारे एक हजार पेक्षा जास्त भाविक या ठिकाणावरून ये जा करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती, केसकर वस्ती, रुपनर वस्ती, ढेले वस्ती, फुरसुंगी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी व या परिसरातील शेताकडे तसेच तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करून जावे लागते. तसेच या वर्दळीच्या पुलाचे लोखंडी कठडे ही खराब झाल्याने वाहनचालकांना सावधानता बाळगत या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे याकडे जलसंपदा विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

रामदरा या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना व कोळपे वस्ती, रूपनर वस्ती, केसकर वस्ती या ठिकाणी राहणा-या स्थानिक नागरिकांना लोणी काळभोर गावात येण्यासाठी हा एकच रस्ता आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना पुलाचा अंदाज आला आहे. परंतु नवख्या लोकांना पुलाचा अंदाज नसल्याने तसेच पुलाची माहिती नसल्याने मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गावामध्ये येण्यासाठी एकच पूल असल्याने प्रवासास धोका आहे. त्याच पुलावरील उघडे कठडे प्रवाशांना अपघातास निमंत्रण देत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे असून नसल्यासारखेच आहेत.

लोणी काळभोर परिसरातील व पुणे शहरातील साधारण एक हजार नागरिक आपली दुचाकी, चारचाकी घेऊन तीर्थक्षेत्र रामदरा येथे दररोज सहकुटुंब येतात. या सर्वां बरोबरच स्थानिक नागरिकांना येण्या जाण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागतो. गेल्या एक वर्षापासून फुरसुंगी रेल्वे स्थानकावर मालधक्का सुरू झालेला आहे. या मालधक्क्यावरुन सिमेंट, सिमेंट सदृष्य माती आदी वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. ३० ते ३५ टन माल भरलेल्या ट्रक या पूलावरून जातात. त्यावेळी पूल अक्षरशः हलतो. एखाद्या गाडी सह पूल लवकरच कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी नवीन पूल बांधावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणा-या रस्त्यावर पुणे कोल्हापूर या लोहमार्गावर पूल बांधावा अशी मागणी ब-याच वर्षांपूर्वी  स्थानिक नागरिकांनी केली होती. परंतु तत्कालीन प्रशासनाने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. दुर्घटना घडण्यापूर्वीच कालव्यावर नवीन पूल बांधावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

याबाबत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले, ” सदरील  ठिकाणचा पूल धोकादायक असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. पुलाचे काम करण्यासाठी पाटबंधारे खात्याला विनंती करण्यात आली असून लवकरच नवीन पूल याठिकाणी बांधण्यात  येईल.”

याबाबत जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता पल्लवी जोशी म्हणाल्या, “या पुलाच्या परिस्थितीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच तातडीने काम सुरु करण्यात येणार आहे.”

लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या, ” कालव्यावरील या पुलाचे काम हे १९६५ साली झाले असून हा पूल तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले दगड, खडी व सिमेंट हे निकामी झाले आहे. अवजड वाहने, मोठ्या गाड्या या पुलावरून गेल्यास पूल कंपन होत आहे. त्यामुळे पूल कधीही पडू शकतो.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

शिवसेनेचे मुख्यमंत्री कधीच दिल्लीला जात नाहीत; संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.