Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : आज्जींच्या छातीत दुखत होतं, तपासाणीला सुरुवात करताचं डॉक्टरही क्षणभर थबकले, ७० वर्षांनंतर उघड झाले रहस्य!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 19 January 2026, 22:04
Nagpur News

photo- social media

Nagpur News : छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सावनेर येथील ७० वर्षीय आजींना हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला ही केस नेहमीप्रमाणे हृदयविकाराचीच असल्याचे वाटत होते. मात्र काही मिनिटांतच डॉक्टरांच्या लक्षात आले की हा रुग्ण ‘सामान्य’ नसून वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत दुर्मीळ आणि आव्हानात्मक प्रकरण आहे.

ईसीजीमध्ये हृदयविकाराचे बदल दिसल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी इको तपासणी करताच एक धक्कादायक बाब समोर आली. हृदय नेहमी ज्या ठिकाणी असते, तिथे ते नव्हतेच. सखोल तपासणीनंतर निष्कर्ष स्पष्ट झाला-या आजींना जन्मजात ‘डेक्स्ट्रोकार्डिया’ ही अवस्था असून त्यांचे हृदय उजव्या बाजूला आहे. विशेष म्हणजे, तब्बल ७० वर्षे ही अवस्था कोणाच्याही लक्षात न येणे हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

अशा स्थितीतही वेळ न दवडता डॉक्टरांनी तातडीने अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हृदय आणि रक्तवाहिन्यांची संपूर्ण रचना आरशात पाहिल्यासारखी उलटी असल्याने ही प्रक्रिया प्रचंड जोखमीची होती. प्रत्येक रक्तवाहिनी विरुद्ध दिशेने असल्यामुळे अतिशय अचूक नियोजन आणि अनुभवाची गरज होती. अनुभवी वैद्यकीय चमूच्या कौशल्यामुळे अँजिओग्राफी यशस्वी झाली आणि हृदयाच्या मुख्य LAD धमनीत ९० टक्के अडथळा असल्याचे आढळले.

यानंतर काळजीपूर्वक अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि आजींचे प्राण वाचले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही गुंतागुंत न होता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यापूर्वी एका रुग्णालयात त्यांना फक्त हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते, मात्र खरे कारण इतके वेगळे असेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती.

 

डॉ. हितेंद्र भागवतकर यांच्या नेतृत्वाखालील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाने आतापर्यंत ७ हजारांहून अधिक निःशुल्क अँजिओप्लास्टी केल्या आहेत. ही केस केवळ एक यशस्वी उपचारकथा नसून, वेळेवर केलेले अचूक निरीक्षण, तज्ज्ञांचे कौशल्य आणि शासकीय आरोग्य योजनांमुळे सामान्य रुग्णांचे प्राण कसे वाचू शकतात, याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

यंदा दसरा २० की २१ ऑक्टोबरला? देवी विसर्जन कधी? जाणून घ्या अचूक तारीख अन् मुहूर्त

Sunday, 11 October 2026, 22:55

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी; आता MPSC आयोगावर सचिव म्हणून पाहणार कामकाज, मंत्री शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Sunday, 11 October 2026, 22:51

समुद्रात मृत्यूचा थरार! ३०५ लोकांनी भरलेली बोट उलटली, १०९ जणांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Sunday, 11 October 2026, 21:34

कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात थेट जमा होणार ४ हजार रुपये? डबल लाभ कोणाला मिळणार? मोठी अपडेट समोर….

Sunday, 11 October 2026, 20:05

शेतजमीन खरेदी करताय? तर ही ‘५’ कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवी; फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वाचा सविस्तर…

Sunday, 11 October 2026, 19:48

६ महिन्यांत नोकरी हवीय? झटपट अभ्यास अन् पटकन नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ कोर्सेसला प्रवेश घ्या आणि कमी वेळात पैसे कमवा

Sunday, 11 October 2026, 19:31
Next Post
Malinda Pushpakumara Record

Malinda Pushpakumara Record : ७०० नव्हे तर थेट १०००! मलिंदा पुष्पकुमाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रचला ऐतिहासिक विक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp