Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपला मोठा धक्का! राज्यसभेची उमेदवारी हुकताच माजी खासदार धर्मेंद्र कश्यप नाराज; पक्ष सोडण्याचे संकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 October 2026, 19:04

पुणे: भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत नाव न आल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी स्पष्टपणे दिसून येत असून, उत्तर प्रदेशातील बरेली येथील भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभेचे तिकीट हुकल्यानंतर धर्मेंद्र कश्यप यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून “टाटा-बाय-बाय” अशी एक ओळीची पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरताच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्या समर्थकांनी निवासस्थानी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या पोस्टचा थेट अर्थ ते भाजपला रामराम ठोकणार असाच काढला जात आहे. राजकीय वर्तुळातील सूत्रांनुसार, ते लवकरच समाजवादी पक्षाच्या (SP) किंवा इतर एखाद्या मोठ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन प्रवेश करू शकतात.

कंधरापूर भागातून राजकारणात दीर्घकाळ सक्रिय असणारे धर्मेंद्र कश्यप हे आपली मुलगी किर्ती कश्यप हिला राजकारणात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. तिची उमेदवारी निश्चित व्हावी यासाठी त्यांनी मोठी राजकीय मोर्चेबांधणी केली होती. परंतु, पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते प्रचंड निराश झाले आहेत.

धर्मेंद्र कश्यप यांचा राजकीय प्रवास पाहता, त्यांनी 2002 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला व राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आंवला (बरेली) मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मनेका गांधी यांच्याकडून त्यांना थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता.

 

त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. तथापि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार नीरज मौर्य यांनी त्यांचा 15,970 मतांनी पराभव केला. तेव्हापासून ते आपल्या मुलीच्या राजकीय भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. आता राज्यसभेची संधीही हुकल्याने त्यांनी पक्षाला बाय-बाय करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इंदापूरात उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाला काठी-लोखंडी पाइपने मारहाण

Thursday, 8 October 2026, 20:58

पूनावाला ग्रुपच्या खासगी गाड्यांवर पोलिसांसारखे लाल-निळे फ्लॅशर; क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांच्या तक्रारीनंतर कारवाई

Thursday, 8 October 2026, 20:29

परवानगी न घेता ‘न्याती इवोक’चे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 19:07

पोलिसांची उद्घोषणा; विद्यार्थी ठाम! एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाचा तिढा कायम; मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका

Thursday, 8 October 2026, 19:04

इंदापूर तालुक्यातील चिंदादेवी गावाजवळ मोटारसायकल घसरून व्यक्तीचा मृत्यू

Thursday, 8 October 2026, 18:43

शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याने लाखो रुपयांचे एआय डिजिटल पॅनल दिलं भेट

Thursday, 8 October 2026, 17:41
Next Post

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp