पुणे : केंद्र सरकारने सामाजिक कल्याणाशी संबंधित चार प्रमुख योजनांच्या नावांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या नव्या निर्णयानुसार, मागील अनेक वर्षांपासून माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 3 निवृत्तीवेतन योजनांचे नाव बदलून आता ‘पंतप्रधान’ योजना असे करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून बदलण्यात आलेल्या योजनाचीं नावे –

1. ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना’ या योजनेचे नाव बदलून आता पंतप्रधान वृद्धावस्था पेन्शन योजना असे करण्यात आले आहे.

2. ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना’या योजनेचे नाव बदलून ‘पंतप्रधान विधवा पेन्शन योजना असे देण्यात आले आहे.
3. ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना’या योजनेचे नाव बदलून पंतप्रधान दिव्यांगजन पेन्शन योजना असे देण्यात आले आहे.
4.पंतप्रधान परिवार लाभ योजना: यासोबतच ‘राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने’चे नाव सुधारून ‘पंतप्रधान परिवार लाभ योजना’ करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सामाजिक सुरक्षा क्षेत्रातील योजनांना आता एक नवीन ओळख मिळणार आहे. यापुढे केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या या सर्व कल्याणकारी योजना याच नवीन नावांनी नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.







