हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील औंढा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना, नराधम आजोबांनीच आपल्या अल्पवयीन नातीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Hingoli Crime)

नेमकं काय घडलं?
ही संतापजनक घटना घडली, त्यावेळी घरात कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित नव्हते. याचा गैरफायदा घेऊन आजोबांनी आपली नियत फिरवली आणि आपल्याच चिमुकल्या नातीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. या भयानक प्रकारानंतर घाबरलेल्या चिमुकलीने कुटुंबातील सदस्यांना घडलेली माहिती सांगितली. हे ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांना मोठा धक्का बसला.

कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता थेट औंढा पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी आजोबांविरुद्ध तक्रार दाखल केली.

हेही वाचा: महसूल खात्याचा ऐतिहासिक निर्णय; १५ रुपयांत मिळणारा डिजिटल ७/१२ , बावनकुळेंची मोठी घोषणा!
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी आजोबांविरोधात त्वरित गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. या संतापजनक प्रकरणाचा अधिक तपास औंढा पोलिसांकडून सध्या सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आजोबा-नातीच्या पवित्र नात्याला धक्का लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: मोठी अपडेट! पुणे विभाग पदवीधर मतदार नोंदणीत मोठी घट; 4.20 लाखांवरून संख्या थेट 2.72 लाखांवर







