Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: पुण्यातील बनावट गुटखा कारखाना कारवाईमुळे गुटखाबंदी नेमकी कोणासाठी? लोणी काळभोर येथील मुख्य गुटखा किंग पोलिसांच्या रडारवर; एफडीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 5 December 2025, 15:21
Loni Kalbhor: Who exactly is the gutkha ban for due to the action against the fake gutkha factory in Pune? Loni Kalbhor's main gutkha king on the police radar; Question mark on the efficiency of the FDA

लोणी काळभोर: महाराष्ट्र सरकारने 2012 पासून गुटखा, (Loni Kalbhor) पान मसाला, आणि तंबाखू मिश्रित (Pune News) पदार्थांच्या उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वितरणावर बंदी घातली आहे. परंतु, पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 2 च्या पथकाने लोणी काळभोर (ता.हवेली) येथील पाटीलवस्ती परिसरात छापा गुरुवारी (ता.4) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टाकला. या छाप्यात पोलिसांनी बनावट आर.एम.डी. गुटख्याच्या कारखान्याचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. गुटखा बंदी असतानादेखील पुण्यासह राज्यभर गुटखा विक्री जोरदार सुरु असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गुटखाबंदी नेमकी कोणासाठी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सुमित गुप्ता व रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता या दोघांनी लोणी काळभोर येथील पाटीलवस्ती परिसरात दोन गोडावून व शेतातील घर भाड्याने घेतले होते. ‘आलेला माल खाली करण्यासाठी व ऑर्डर आल्यानंतर माल पुन्हा गाडीत भरण्यासाठी कामगार एका खोलीत राहणार आहे’ असे गोडावून व शेतमालकाला सांगितले होते. परंतु, कामगार हे रात्रीच्या वेळी मशीन चालू करून रात्रभर आर.एम.डी. व विमल गुटख्यात मिक्स करण्यासाठी सुगंधित तंबाखूच्या पुड्या तयार करत होते आणि पहाट झाली की मशीन बंद केली जात होती.

दररोज रात्रीच्या वेळी गाड्या येत होत्या व रात्रीच्याच वेळी माल घेऊन परत जात होत्या. सुमित गुप्ता व रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता यांच्याकडून कामगारांना जीवनाश्यक वस्तू जागेवर पुरवल्या जात होत्या. कामगारांना दिवसा बाहेर न पडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कामगारही बाहेर पडत नव्हते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून बनावट गुटखा बनविण्याचे काम जोराने सुरु होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात हा माल पुरविला जात होता. या अवैध धंद्याबाबत कोणालाही माहिती नव्हती. परंतु, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र दोनचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना या अवैध गुटखा बनवणाऱ्या कारखान्याची चाहूल लागली आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी धाड टाकली. या छाप्यात पोलिसांनी 4 जणांना अटक करून सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, पानटपऱ्या, किराणा दुकान व चहाचे स्टाॅलमधून गुटखा विक्री राजरोसपणे सुरु आहे. प्रशासन कारवाई करत नसल्याने गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे. गुटखा बंदी प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावी लागणार आहेत. गुटखा बंदी करणे हे प्रशासनासमोर सर्वांत मोठे आव्हान सध्या उभे राहिले आहे.

 

लोणी काळभोर येथील मुख्य गुटखा किंग पोलिसांच्या रडारवर

गुटखा बंदी कायदा हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून लोणी काळभोरला दररोज ट्रकभरून गुटखा मागविला जात आहे. तसेच या गुटख्याची टपरी व दुकानांनी खुलेआम विक्री केली जात आहे. लोणी काळभोर येथील मुख्य गुटखा किंग हा पडद्यामागचा विलन असून तो अद्यापपर्यंत समोर आलेला नाही. परंतु,तो पोलिसांच्या रडारवर आला आहे. अशी पोलिसांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

नायगाव रस्त्यावरही गुटख्याचे गोडाऊन

बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्याची कोणालाही माहिती मिळू नये. व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गुप्ता यांनी थेऊर नायगाव रस्त्यावर एक भले मोठे गोडाऊन घेतले आहे. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केला जातो व याच गोडाऊनमधून मधून गुटख्याची डिलिव्हरी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, पोलीस प्रशासनाने या गोडाऊनवर कारवाई केलेली नाही. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

गुटखा, पान मसाला आणि तंबाखू मिश्रित पदार्थ व नशायुक्त पानाच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांमधुन प्रसिद्ध झाल्या आहेत. तरुणांच्या ऊज्वल भविष्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे अशा टपऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून कारवाईची बडगा उगारला नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासन या प्रश्नांवर गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post
Pune Mahapalika Election: Big rush even before the code of conduct! Chief Minister in the fray to get Pune Municipal Corporation's projects worth crores on track? Administration's rush begins

Pune Mahapalika Election: आचारसंहितेपूर्वीच मोठी धावपळ! पुणे मनपाचे कोट्यवधींचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात? प्रशासनाची लगबग सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp