Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वकिलाला लोणीकंद पोलीस ठाण्यात बेदम मारहाण? सीसीटीव्ही जप्त करून चौकशीची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 August 2026, 9:03

अक्षय टेमगिरे

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई नितीन पोंगे यांच्यावर शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी अॅड. शेख यांनी संबंधित पोलीस शिपायाविरोधात लेखी तक्रार दाखल करत, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

तक्रारीनुसार अॅड. साहिल शेख हे मित्रासह दुचाकीवरून वाघोलीहून कोरेगाव भीमा येथे जात असताना रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी झाली होती त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या त्यांच्या मित्राच्या पाठीवर पोलीस शिपाई नितीन पोंगे यांनी कोणतेही कारण नसताना तीन ते चार ठोसे मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी अॅड. शेख यांनी दुचाकी बाजूला थांबवून माझ्या मित्राला का मारले?असा प्रश्न विचारला असता पोलीस शिपायाने त्यांच्यावरच हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना फरपटत लोणीकंद पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तेथेही मारहाण सुरूच ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मीदेखील वकील असून मला जाब विचारण्याचा अधिकार आहे असे सांगूनही पोलीस शिपायाने अॅड. शेख यांच्या कानामागे व डोक्यावर सुमारे २० ते २२ वेळा प्रहार केला आहे.या घटनेची माहिती त्याच रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रोकडे तसेच पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काळूराम भुजबळ यांनाही देण्यात आली.

ही घटना पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्याने संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित फुटेज तातडीने जप्त करून पुरावा सुरक्षित ठेवण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

या घटनेमुळे वकील वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यावरच असे गंभीर आरोप होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलीस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाहीत. तक्रारीतील आरोप हे तक्रारदाराचे म्हणणे असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वकिलाला लोणीकंद पोलीस ठाण्यात बेदम मारहाण? सीसीटीव्ही जप्त करून चौकशीची मागणी

Sunday, 2 August 2026, 9:03

उपमुख्यमंत्री शिंदेकडून संजय शिरसांटाची खरडपट्टी ; अभिजित दिपकेंच्या घरी जाण भोवलं, नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 8:53

“अभिजीत दिपकेंच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह! पैशाचा स्रोत काय? वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी थेट पत्र”

Sunday, 2 August 2026, 8:16

प्रवांशासाठी महत्वाची माहिती! आज पुणे रेल्वे स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द,

Sunday, 2 August 2026, 7:52

राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पण कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार सरींचा इशारा!

Sunday, 2 August 2026, 7:31

रविवारचा राजयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा;प्रत्येक कामात मिळणार यश

Sunday, 2 August 2026, 7:14
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.