Kolhapur Politics: कोल्हापूर : कोल्हापूर शहरातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका मनसेच्या नेत्याने महिला अधिकाऱ्यासोबत अश्लिल वर्तन केले आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Politics)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या कार्यालयात जाऊन मनसे अधिकाऱ्यांनी धमकावले आहे. ऐवढंच नव्हे तर महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण केले. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरुध्द गुन्हा नोंदवला. पोलिसांनी प्रसाद पाटील आणि त्यांच्या सहकार्यांविरुध गुन्हा दाखल केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती मिळाल्यानंतरही प्रसाद पाटील यांनी महिला अधिकाऱ्याशी वाद घातल्याचा आरोप आहे. 30 दिवसांचा कायदेशीर कालावधी असूनही “माहिती आत्ताच द्या” असा दबाव टाकत त्यांनी एकेरी भाषा वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, फोनवर बोलताना संबंधित महिला अधिकाऱ्याचा ‘छमीया’ असा अवमानास्पद उल्लेख केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, प्रसाद पाटील यांनी महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला, मोठ्याने अपशब्द वापरला आणि शासकीय वेळ संपल्यानंतरही कार्यालयात थांबून धिंगाना घातला. जबरदस्तीने कार्यालयात थांबून माहिती मिळवण्यासाठी दबाव टाकला. अधिकारी महिला आहे म्हणून वाचल्या नाही तर पुरुष असता तर कपडे फाडून मारहाण केली असती अश्या भाषेत बोलल्याचा आरोप आहे.






