लोणी काळभोर : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील माजी उपसरपंच ज्योती अमित काळभोर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा वडाळे वस्ती येथे सोमवारी (ता. १२) वृक्षारोपण केले.
ज्योती काळभोर यांचा वाढदिवस आज सोमवारी (ता.१२) आहे. वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत काळभोर यांनी ल्हा परिषद शाळा वडाळे वस्ती परिसरात वृक्षारोपण करून हा उपक्रम राबविला आहे.
दरम्यान, ज्योती काळभोर यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून खूप चांगला उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. तसेच यातून काळभोर यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेशही दिला. काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य योगेश काळभोर, भरत काळभोर, सविता लांडगे, ललिता काळभोर, संगीता सखाराम काळभोर, राष्ट्रवादीचे तालुका युवक उपाध्यक्ष अमित काळभोर, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, माजी उपसरपंच राजू काळभोर, सागर काळभोर, संजय वीरकर, गुलाब काळभोर, उत्तम काळभोर, बापू काळभोर, दत्तात्रय काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, अतुल काळभोर, पप्पू वीरकर, स्वप्नील काळभोर, व जिल्हा परिषद शाळा वडाळे वस्ती मुख्याध्यापक, शिक्षिका व इतर मान्यवर उपस्थित होते.