Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धानोरीत घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैध रिफिलिंग; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 November 2026, 11:36

पुणे : घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधील गॅस हायड्रोलिक पाइपच्या साहाय्याने लहान व व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून त्याची चढ्या दराने विक्री करण्याचा अवैध व्यवसाय गुन्हे शाखा युनिट-4 ने उघडकीस आणला आहे. धानोरी येथील टिंगरेनगर परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी 80 हजार 600 रुपयांचे गॅस सिलेंडर आणि रिफिलिंगचे साहित्य जप्त केले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-4 च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या आदेशानुसार पथक 13 नोव्हेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार अनिकेत भोसले यांना टिंगरेनगर-धानोरी रोडवरील हरेकृष्णा पार्क परिसरात धनलक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स दुकानाजवळील एका पडक्या शेडमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या पथकाने पंचांसह सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी हीराराम पिलाराम चौधरी (वय 43) हा घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरताना रंगेहात आढळला. चौकशीत हा व्यवसाय मालक नारायणलाल मांगीलाल चौधरी (वय 42) याच्या सांगण्यावरून सुरू असल्याचे समोर आले. या व्यवसायासाठी कोणताही अधिकृत परवाना नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एचपी कंपनीचे घरगुती व व्यावसायिक सिलेंडर, कॅबसन्स कंपनीचे 15 छोटे सिलेंडर, सहा गॅस फिलर, इलेक्ट्रिक वजनकाटा, हायड्रोलिक पाइप आणि अन्य साहित्य असा एकूण 80 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

घरगुती वापरासाठीच्या गॅसचा विनापरवाना साठा करून रहिवासी भागात असुरक्षित पद्धतीने रिफिलिंग आणि विक्री सुरू असल्याने नागरिकांच्या जीविताला व मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकत होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम 287, 288, 289, 290 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि स्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस हवालदार नितीन साबळे व पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात भीषण अपघात! एनडीए रोडवर झोपलेल्या व्यक्तीला क्रेनने चिरडलं; 42 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू..

Sunday, 15 November 2026, 13:54

हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; 11 वाहनांची तोडफोड

Sunday, 15 November 2026, 13:42

Breaking News : येवलेवाडीत वासरावर अत्याचार, डोळे काढून हत्या केल्याचा आरोप ; दोन महिन्यांत तिसरी घटना.

Sunday, 15 November 2026, 13:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाट्यासमोर चार वाहनांचा अपघात ; वेरनाच्या अचानक ब्रेकमुळे बोलेरो, मालवाहू टेम्पो आणि हायरायडर एकमेकांवर आदळले

Sunday, 15 November 2026, 12:44

पुणे -सोलापूर महामार्गावर व्हेन्यू कारच्या धडकेत आयशर टेम्पो उलटला; नऊ जण जखमी

Sunday, 15 November 2026, 12:24

पुण्यात इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग! लँडिंग गिअरमध्ये बिघाड, प्रवाशांचा जीव टांगणीला!

Sunday, 15 November 2026, 12:08
Next Post

नाना पाटेकरांच्या नावाने नवी मुंबईत भव्य नाट्यगृह उभारणार! मंत्री गणेश नाईकांची घोषणा; मराठी रंगभूमीला नवी भेट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp