Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! मटका, जुगार, गांजा अन् देहविक्रीच्या खुलेआम धंद्याचा व्हिडिओ पहा; ‘वसुली’च्या चर्चेने पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 31 October 2026, 13:16

लोणी काळभोर : पुणे शहरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदेचालकांविरोधात कठोर भूमिका घेत मोका, एमपीडीए आणि तडीपारीसारख्या कारवायांचा धडाका लावला आहे. त्यामुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असताना, पुण्याच्या पूर्व भागातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरात कारवाईचा धडाका आणि ग्रामीण भागात अवैध धंद्यांना मोकळे रान, असा विरोधाभास निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या धंद्यांना कोणाचे अभय आहे आणि स्थानिक पोलीस प्रशासन नेमके करतेय तरी काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सोरतापवाडी बनतेय अवैध धंद्यांचे केंद्र?

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री, हातभट्टीची दारू, हॉटेलमधून अवैध दारूविक्री, वेश्याव्यवसाय, मटका-जुगार आणि पत्त्यांचे क्लब खुलेआम सुरू आहेत. या अवैध धंद्यांमधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून अवैध धंदेचालकांकडून लाखो रुपयांचे हप्ते गोळा केले जात असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सोरतापवाडी येथे एका मटकाकिंगने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून राजरोसपणे मटका-जुगार सुरू आहे. तर वाकडा पूलाजवळ असलेल्या एका लॉज’मधून देहविक्रीचा खुलेआम व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे सध्या सोरतापवाडी हे अवैध धंद्यांचे केंद्र बनत चालले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उरुळी कांचन बाजार मैदानात चार मटक्यांचे अड्डे

उरुळी कांचन गावातील बाजार मैदान परिसरात चार ठिकाणी मटका-जुगार सुरू आहे. पुणे प्राईम न्यूजने केलेल्या पाहणीदरम्यान या परिसरातील कथित मटका व्यवसायाचे व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच ए.के. लॉजमधील कथित देहविक्री व्यवसायासंदर्भातील व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकारांमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दोन दिवस धंदा बंद, नंतर पुन्हा सुरू; कारवाई की केवळ फार्स?

वाकड्या पुलाजवळील लॉजमधील कथित देहविक्री व्यवसायासंदर्भातील व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित व्यवसाय दोन दिवस बंद ठेवण्यास सांगितले जात असल्याची चर्चा आहे. त्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू होत असल्याचा आरोप केला जात आहे. जर हे आरोप खरे असतील, तर केवळ दोन दिवस धंदा बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचा प्रकार म्हणजे कायद्याची उघडपणे थट्टा नाही का? अवैध धंदेचालकांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

एसपी गिल साहेब, आता चौकशीचा बडगा उगारा!

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध धंद्यांची स्वतंत्र पथकामार्फत तपासणी करावी. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेचालकांशी आर्थिक हितसंबंध आहेत का, याची निष्पक्ष चौकशी करावी. आवश्यकतेनुसार कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित पुराव्यांची कायदेशीर पद्धतीने तपासणी करावी. दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अवैध धंदेचालकांना कायद्याचा धाक दाखवणार कोण?

एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देत असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर असे धंदे सुरू असल्याचे आरोप होत असतील, तर ही बाब पोलीस प्रशासनासाठी निश्चितच चिंताजनक आहे. अवैध धंदेचालकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा संशय नागरिकांमध्ये निर्माण होत असेल, तर तो दूर करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच आहे. अन्यथा, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होण्यास वेळ लागणार नाही.

दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे व्हिडिओ आणि आरोप समोर येत असताना वरिष्ठ पोलीस प्रशासन कारवाईची वाट का पाहत आहे? या धंद्यांचे खरे सूत्रधार कोण आणि त्यांना कोणाचे अभय आहे? असा सवाल पुणे प्राईम न्यूजचा पोलीस प्रशासनाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

12 किलो गांजासह अटक झालेला पोलिस अंमलदार शासकीय सेवेतून बडतर्फ; तेलंगणातील वारंगलमध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कारवाई

Saturday, 31 October 2026, 13:32

उरुळी कांचन पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! मटका, जुगार, गांजा अन् देहविक्रीच्या खुलेआम धंद्याचा व्हिडिओ पहा; ‘वसुली’च्या चर्चेने पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात!

Saturday, 31 October 2026, 13:16

शिरूर नगरपरिषदेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत! मितेश गादिया यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर; ‘नितीन पाचर्णे’ होणार उपनगराध्यक्ष?

Saturday, 31 October 2026, 12:33

उजनी धरणातून सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी गती! मोठ्या प्रकल्पाची तयारी; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची महत्त्वपूर्ण माहिती

Saturday, 31 October 2026, 12:21

पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरी बसची दुचाकीला धडक ; सहजपूर येथील 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक बस सोडून पसार

Saturday, 31 October 2026, 12:01

आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा गुन्हेगारी कारनामे ! अखेर पुणे पोलिसातील कर्मचाऱ्याचं भिंग फुटलं..

Saturday, 31 October 2026, 11:26
Next Post

12 किलो गांजासह अटक झालेला पोलिस अंमलदार शासकीय सेवेतून बडतर्फ; तेलंगणातील वारंगलमध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp