Horoscope Today: वैदिक पंचांगानुसार, आज 26 नोव्हेंबर 2025 असून मार्गशीर्ष महिना सुरू आहे. आज चंपाषष्ठी आहे. आज ग्रहांचा एक दुर्लभ संयोग जुळून येत आहे. या ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल, कोणाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, हे जाणून घेऊया.

पाहा संपूर्ण 12 राशींचे राशीभविष्य
मेष रास (Aries) मेष राशीसाठी आजचा दिवस अनुकूल नसला तरी, तुम्ही अत्यंत शांतपणे सर्व कामे पूर्णत्वास न्याल. कामात सातत्य आणि संयम ठेवल्यास यश मिळेल. कुटुंबासोबतचे संबंध सौहार्दाचे ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. सायंकाळी स्वतःसाठी वेळ काढून मनःशांती मिळवा. मालमत्तेसंबंधीच्या कामांमध्ये आज थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकला.
वृषभ रास (Taurus) वृषभ राशीच्या लोकांसाठी आज दिवस कष्टदायी राहू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही मध्यस्थीची भूमिका घेऊन शांतता राखण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आर्थिक बाजू साधारणपणे चांगली असली तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल आणि तुमचा वेळ चांगला जाईल.
मिथुन रास (Gemini) मिथुन राशीच्या व्यक्तींनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या बोलण्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल आहे आणि त्यांना अपेक्षित परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही आज जिदीने सर्व कामे पूर्ण कराल.
कर्क रास (Cancer) कर्क राशीच्या लोकांचे मन काहीसे अस्थिर राहील. कामाचा ताण आणि वैयक्तिक चिंता यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, मनःशांती मिळवण्यासाठी शांत राहा ध्यान करा. यामुळे मानसिक त्रास कमी होईल. कोणत्याही मोठ्या वादात पडणे आज टाळा.
सिंह रास (Leo) आज सिंह राशीच्या लोकांनी दिलेला शब्द नक्की पाळा, अन्यथा संबंध बिघडू शकतात. सामाजिक कार्यामुळे तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या रास (Virgo) आज कन्या राशीच्या लोकांची कामातील अचूकता आणि वेग पाहून वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश होतील. तुमच्या कामाची पद्धत आज इतरांना प्रेरणा देणारी ठरू शकते. आज घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यात खूप फायदेशीर ठरतील, त्यामुळे गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल.
तूळ रास (Libra) सरकारी नोकरीमध्ये असलेल्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मिश्र आहे. वरिष्ठांकडून तुम्हाला नवीन आणि मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ही नवी जबाबदारी तुमच्या पदात आणि मान-सन्मानात वाढ करेल. तुमच्या अधिकाराचा वापर इतरांना मदत करण्यासाठी करा. कुटुंबासोबत आनंदाचे आणि समाधानाचे क्षण घालवण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio) वृश्चिक राशीच्या लोकांना काही मदत पाहिजे असल्यास जवळच्या लोकांची मदत घ्यावी लागेल. आर्थिक नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज चांगला उत्साह जाणवेल आणि यश मिळेल. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा छोटे गैरसमज मोठे वाद निर्माण करू शकतात. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करणे टाळा.
धनु रास (Sagittarius) धनु राशीसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या दिलासा देणारा ठरेल. अडकलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. हे प्रवास तुमच्यासाठी लाभदायक आणि उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार किंवा मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आज महत्त्वाचे ठरेल.
मकर रास (Capricorn) मकर राशीच्या व्यक्तींना आज डोके शांत ठेवण्याची नितांत गरज आहे. संयमाने काम केल्यास गुंतागुंतीच्या समस्या सहज सोडवता येतील आणि कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत सामंजस्याने वागून वातावरण चांगले ठेवा.
कुंभ रास (Aquarius) कुंभ राशीचे लोक आज तुमची स्वतःची क्षमता आणि मर्यादा ओळखून कोणतेही काम हाती घ्याल आणि ते परिपूर्ण कराल. अतिआत्मविश्वास टाळून योग्य नियोजन केल्यास तुम्हाला मोठे यश मिळेल. अनुभवी व्यक्तींकडून तुम्हाला आवश्यक मदत मिळेल, ज्यामुळे तुमचे कार्य सोपे होईल.
मीन रास (Pisces) मीन राशीच्या लोकांनो, आज आर्थिक बाबींसाठी दिवस अत्यंत चांगला आहे. तुम्ही इतरांना दिलेले कर्ज किंवा बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळण्याची दाट शक्यता आहे. जवळच्या आणि विश्वासू व्यक्तींकडून तुम्हाला खूप चांगले मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे तुमचे कोणतेही मोठे काम मार्गी लागेल.
(Disclaimer- प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहांची स्थिती वेगळी असते. त्यामुळे राशीभविष्यातील परिणाम व्यक्तिपरत्वे बदलू शकतात ही माहिती केवळ सामान्य मार्गदर्शन आणि मनोरंजनासाठी दिलेली आहे. जीवनातील मोठे निर्णय घेताना किंवा गंभीर समस्यांवर उपाय करताना वैयक्तिक ज्योतिषी किंवा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)







