Hind kesari पुणे, ता. 18 : सातारातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यातील बहुचर्चित अंतिम लढत अवघ्या काही क्षणांतच वादाच्या भोवऱ्यात सापडली. पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर अखेर त्याला माघार घ्यावी लागली आणि महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले. Hind kesari

अंतिम फेरी सुरू होताच महेंद्र गायकवाडने आक्रमक खेळी करत पृथ्वीराज मोहोळवर दबाव निर्माण केला. सुरुवातीलाच महेंद्रने दोन गुण मिळवत आघाडी घेतली. याचवेळी पृथ्वीराज खाली असताना त्याच्या उजव्या हातावर डाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र या चकमकीदरम्यान पृथ्वीराजचा हात उलटा वाकल्याने तो वेदनेने विव्हळला. काही क्षणांसाठी सामना थांबवण्यात आला. Hind kesari
या प्रकारानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि त्यांचे वडील राजेंद्र मोहोळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पृथ्वीराज पुन्हा मैदानात उतरण्याचा प्रयत्न करत होता, मात्र हात अजिबात हलत नसल्याने अखेर त्याने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंचांनी महेंद्र गायकवाडला विजयी घोषित केले. Hind kesari
महेंद्र गायकवाडला विजयी घोषित होताच भावनांचा बांध फुटला. तीन वेळा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागलेल्या महेंद्रने अखेर हिंद केसरी किताबावर नाव कोरले. यंदा हिंद केसरीची गदा महाराष्ट्रातच राहणार हे निश्चित झाले होते. मात्र अंतिम फेरीतील वादामुळे अनेक कुस्तीप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. Hind kesari
महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्राचा दहावा आणि देशातील ३९ वा हिंद केसरी ठरला आहे. विजेतेपदासोबत त्याने हिंद केसरीची मानाची गदा आणि थार गाडीही पटकावली. स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने अनेक नामांकित मल्लांना धूळ चारली होती. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचाही त्याने पराभव केला होता. Hind kesari
दरम्यान, अंतिम फेरीतील प्रकारानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी महेंद्रच्या आक्रमक डावपेचांवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काहींनी हा कुस्तीतील खेळाचा भाग असल्याचे मत व्यक्त केले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील २८ राज्यांमधील सुमारे ८५० मल्ल सहभागी झाले होते. भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.







