Gowal Padvi : महाराष्ट्रातील काँग्रेसचे तरुण खासदार गोवाल पाडवी यांच्या एका विधानामुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या मागणीमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेस हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. (Gowal Padvi)

काय म्हणाले पाडवी?
पाडवी म्हणाले की, 1931 साली इंग्रजांनी जनगणना करताना आदिवासींना स्वतंत्र धार्मिक श्रेणीत मोजलं होतं. आदिवासींची संस्कृती, जीवनशैली आणि श्रद्धा या इतर धर्मांपेक्षा वेगळ्या आहेत, म्हणून आजही त्यांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळायला हवी, असा त्यांचा आग्रह होता. काँग्रेसनेच हे भाषण सोशल मीडियावर टाकले आणि तिथूनच वादाला पेट चढला.
सोशल मीडियावर बरेच लोक म्हणतायत की ही मागणी आदिवासींचं हित जपण्यासाठी नाही, तर हिंदू समाजाला विभागण्यासाठी आहे. एका यूजरने तर सांगितलं की, इंग्रजांनी तेव्हा “तोडा आणि राज्य करा” या धोरणाखाली आदिवासींना वेगळी श्रेणी दिली होती, पण नंतर 1941 साली त्यांना पुन्हा हिंदू श्रेणीत घेतलं, कारण ते मूळचे हिंदू समाजाचाच भाग आहेत.
1931 की जनगणना के दौरान जब देश ब्रिटिश शासन में था, तब आदिवासी वर्ग को अलग श्रेणी में गिना गया था। ये श्रेणी सभी प्रमुख धर्मों के साथ बराबरी से सूचीबद्ध थी।
ये कहा गया था कि आदिवासियों की विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक और आध्यात्मिक पहचान किसी अन्य धर्म के साथ समाहित नहीं होती है।… pic.twitter.com/MTEUN2UoII
— Congress (@INCIndia) December 3, 2025
काहींनी गंभीर इशारेही दिलेत. जर आदिवासींना स्वतंत्र धर्म दिला, तर ते ‘अनुसूचित जमाती’चा दर्जाच गमावू शकतात, कारण आरक्षणाचा लाभ हिंदू, बौद्ध आणि शीख परंपरेशी जोडलेल्या समाजांना मिळतो. त्यामुळे मिशनऱ्यांना धर्मांतराची आणखी मोकळीक मिळेल आणि हा प्रस्ताव आदिवासींच्या संस्कृतीला धक्का देणारा आहे, अशी टीका अनेकांनी केली आहे.







