Gold Silver Rate : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे गेल्या काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र 5 मार्च रोजी या दरवाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. सराफा बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

India Bullion and Jewellers Association (IBJA) ने जाहीर केलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 2,698 ने घसरून 1,59,850 प्रति 10 ग्राम झाला आहे. यापूर्वी सोन्याने 1,76,121 असा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने सुमारे 16,271 ने स्वस्त झाले आहे. जीएसटीसह सोन्याचा दर सध्या सुमारे 1,64,645 प्रति 10 ग्राम इतका आहे.
त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 1,50,815 प्रति तोळा आहे, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,23,484 प्रति तोळा इतका नोंदवला गेला आहे. आयबीजेए दिवसातून 2 वेळा सोन्याचे अधिकृत दर जाहीर करत असते.
दरम्यान, प्रत्यक्ष सराफा बाजारात मात्र किंचित वेगळे चित्र दिसत आहे. Bullions.co.in च्या माहितीनुसार देशातील काही प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 240 ने वाढून 1,61,770 झाला आहे. मुंबईमध्ये 230 वाढीसह दर 1,62,040, कोलकात्यात 1,61,830, चेन्नईमध्ये 1,62,520, तर लखनऊमध्ये 1,62,100 प्रति 10 gram असा दर नोंदवला गेला आहे.
चांदीच्या दरातही घसरण
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आयबीजेएच्या माहितीनुसार चांदीच्या दरात 13,547 इतकी घट झाली असून जीएसटीशिवाय चांदीचा दर 2,57,800 प्रति किलो आहे. जीएसटीसह चांदीचा दर सुमारे 2.65 लाख प्रति किलो इतका आहे.
विशेष म्हणजे 29 जानेवारी 2026 रोजी चांदीचा दर 3,85,933 प्रति किलो या उच्चांकावर पोहोचला होता. त्या तुलनेत सध्या चांदी सुमारे 1,28,133 ने स्वस्त झाली आहे.
शहरनिहाय चांदीचे दर
दिल्लीमध्ये चांदीचा दर 2,64,190, मुंबईत 2,64,650, कोलकात्यात 2,64,300, पाटण्यात 2,64,510, जयपूरमध्ये 2,64,610, तर लखनऊमध्ये 2,65,290 प्रति किलो असा आहे.
जागतिक आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती आणि भूराजनैतिक तणाव यांचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरांवर होत असतो. अशा काळात गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडी वाढल्या की सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येतात.







