पुणे : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजीचा प्रवास सुरूच आहे. आज , 23 जुलै रोजी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांकी पातळीकडे वाटचाल केली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,520 रुपयावर पोहचला आहे.मागच्या 6दिवसांतच प्रति 100 ग्रॅम सोनं तब्बल 50000रुपयांनी महाग झालं आहे.

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण, लग्नसराईची खरेदी आणि स्वस्त दरांत झालेली गुंतवणूक यामुळे मौल्यवान धातूंना मोठी तेजी मिळाली आहे.मुंबई व पुणे या दोन्ही शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,520 तर 22 कॅरेटचा भाव 1,34,310 नोंदवला गेला आहे.तसेच दिल्लीत 24 कॅरेट सोने 1,46,570 तर 22 कॅरेट सोने ₹1,34,460 वर पोहोचले आहे.

सोन्यासोबतच चांदीच्या भावातही जोरदार वाढ झाली असून देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 2,40,100 प्रति किलो वर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा भाव $4,133.39 प्रति औंस तर ‘स्पॉट सिल्व्हर’चा भाव $59.78 प्रति औंस झाला आहे. जागतिक पातळीवरील या आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे.
जागतिक घडामोडी आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून वाढती मागणी पाहता, येत्या दिवसांत सोने-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार चालूच राहणार आहेत.त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांनी बाजारातील नवनवीन दरांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.






