Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुली व महिलांच्या संरक्षणासाठी शाळा व सार्वजनिक ठिकाणी ‘आवाहन फलक’ ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा अनोखा उपक्रम, मुलींना मिळणार अभय..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 October 2022, 16:50

कर्जत : कर्जत तालुक्यातील शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी मुली व महिलांना होणाऱ्या त्रासावर आळा घालण्यासाठी कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी आता भन्नाट उपक्रम राबविला आहे. सर्व शाळा-महाविद्यालये व बसस्थानकात कर्जत पोलीस स्टेशन व २४ तास सुरू असलेला हेल्पलाईन नंबर तसेच स्वतःचा संपर्क क्रमांक असलेले ‘आवाहन फलक’ लावण्याचे काम सुरू आहे. हे फलक मुली व महिलांसाठी ढाल म्हणून करणार आहेत.

मागील काळात महिला-मुलींना त्रासाबाबतच्या अनेक तक्रारींचा आलेख पाहता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन मुली-महिलांना निर्भयतेचे धडे दिले. ‘कुणी जर त्रास दिला तर कायदेशीर कारवाई करू’ असे आश्वस्त केले. संपर्कासाठी क्रमांक उपलब्ध करून दिले. तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येत असल्याने शेकडो तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. अनेक मुली-महिलांनी स्वतः यादव यांना फोनवरून तक्रारी केल्या.गुदमरलेल्या अनेक मुलींचा श्वास यादव यांनी क्षणात मोकळा केला. महिला सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेकांवर कायदेशीर कारवाया केल्या. मुलींना पोलीस ठाण्याबाबतच्या कामकाजाची माहिती व्हावी तसेच तक्रार कशी दाखल करावी?पोलिसांचे काम कसे चालते? याबाबत माहिती मिळावी म्हणून मुलींसाठी पोलीस ठाण्यात वेळोवेळी सहलीचे आयोजन केले.

असे असताना जेंव्हा मुली शाळा महाविद्यालय भरताना व सुटताना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासोबत असे अनुचित प्रकार घडतात अशावेळी पोलीस यंत्रणेला संपर्क साधता येत नाही मात्र अशावेळी हे आवाहन फलक ‘ढाल’ बनून मुलींचे रक्षण करणार आहेत. हे फलक लावताना स्वतः पोलीस निरीक्षक हे विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना या फलकाविषयी माहिती देत आहेत. जेंव्हा कोणतीही मदत मिळणार नाही तेंव्हा हे फलकच ‘संकटकालीन मार्ग’ म्हणून काम करणार आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत असतात मात्र अनेक योजना कुचकामी ठरतात. पोलीस निरीक्षक यादव यांनी मुली- महिलांच्या सुरक्षिततेसाठी आत्तापर्यंत अनेक संकल्पना राबवल्या.

 

त्यामुळे पोलिसांबाबत असलेली भीती, गैरसमज दूर होण्यास मदत झाली. अनेक मुलींना न्याय मिळवून देऊन विश्वास संपादन केला. हे फलक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा, कॉलेज, बस स्थानक, मुलींचे वसतिगृह तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत आहेत. आज रोजी सदरचे फलक दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी शाळा, कोटा मेंटर शाळा तसेच दोन मुलींचे वसतीग्रह, कर्जत बस स्थानक या ठिकाणी लावण्यात आले. यावेळी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नगरकर तसेच पत्रकार गणेश जेवरे मोतीराम शिंदे अफरोज पठाण आशिष बोरा पोलीस जवान मनोज लातूरकर, शकील बेग हे उपस्थित होते. हे बोर्ड लावण्या कामी श्री माऊली कदम, जय फेब्रिकेशन, राशीन यांनी आर्थिक सहकार्य दिले त्यासाठी त्यांचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आभार मानले.

“असा आहे आवाहन फलक”
“सर्व विद्यार्थिनी व महिलांना सुचित करण्यात येते की,उच्च माध्यमिक,महाविद्यालयीन विद्यार्थी,शाळाबाह्य मुले,पुरुष तसेच ओळखीच्या अनोळखी लोकांनी आपल्याला वाईट उद्देशाने टक लावून पाहणे,मागे फिरणे,इशारे करणे,वारंवार फोन मॅसेज करणे,धमकावणे,प्रवासामध्ये जवळ बसण्याचा प्रयत्न करणे व इतर अशा कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास आपण न घाबरता कर्जत पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी”

“आवाहन फलक असे करेल काम”
“कोणत्याही पीडित मुली-महिलेसोबत कुणी ओळख-अनोळखी व्यक्ती छेडछाड किंवा चुकीचे वागत असेल तर तिला तात्काळ पोलिसांशी संपर्क साधता येईल. जर संपर्क साधने शक्य नसल्यास हा प्रकार पाहणारे प्रत्यक्षदर्शी नागरिक या आवाहन फलकांवरील क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळवू शकतात.विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येत असल्याने अशा घटना रोखता येतील.”

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

स्टेट बँकेकडून ग्राहकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट ; एफडीच्या व्याजदरात केली वाढ 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.